कर्मचारी वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट पेन्शन (pension)खात्यात वळवण्याची मुभा मिळणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली.

या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी अधिक आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ही सुविधा राबवल्यामुळे निवृत्ती फंड अधिक मजबूत होईल आणि सदस्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळेल.केंद्र सरकारचा अंदाज आहे की या निर्णयाचा फायदा देशभरातील जवळपास 30 कोटी ईपीएफओ सदस्यांना होईल. सध्या ईपीएफओ खात्यांवर वार्षिक 8.25 टक्के व्याजदर लागू असून, चक्रवाढ व्याजाचा लाभही सदस्यांना मिळतो. या नवीन योजनेमुळे सदस्यांना दीर्घकालीन बचत आणि निवृत्ती नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

ईपीएफओने अंशतः पैसे काढण्याच्या जुन्या 13 नियमांना आता तीन प्रमुख श्रेणींमध्ये एकत्र केले आहे — मूलभूत गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती. या बदलामुळे(pension) पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली असून, कर्मचाऱ्यांना वेळ वाचणार आहे.दरम्यान, केंद्र सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि संबंधित फंड्सवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 2025-26 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी GPF वरील व्याजदर 7.1 टक्के राहणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पीएफ धारकांना दुहेरी लाभ मिळणार आहे.

तसेच, नोकरी सोडल्यानंतर पीएफ रक्कम काढण्याविषयी असलेली गोंधळाची स्थितीही ईपीएफओने स्पष्ट केली आहे. नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी लगेच 75 टक्के रक्कम काढू शकतो, तर उर्वरित रक्कम बेरोजगारीच्या एका वर्षानंतर काढता येईल. यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना किंवा नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरातील वसतिगृह मारहाण प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल…
बहिणीला बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये पाहिलं, भावाला राग अनावर, हॉकी स्टिक काढली अन्…
ऑस्ट्रेलियाला पोहोचताच Virat Kohli ची नवी पोस्ट व्हायरल…