अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वरसोली बीचवर धक्कादायक घटना घडली आहे, जिथे बहिणीच्या(sister) प्रेमसंबंधावर राग धरून एका भावाने तिच्या प्रियकरावर हॉकी स्टीकने हल्ला केला. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव लावण्य उदेश गावंड (वय 21, रा. साई मंदिर, मांडवा, अलिबाग) असून, आरोपीचे नाव आदित्य पाटील असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, लावण्य गावंडाला बहिणीने फोन करून वरसोली बीचवर भेटण्यासाठी बोलावले होते. लावण्य आपल्या चारचाकी वाहनासह पोहोचला आणि बहिणीसोबत (sister)गप्पा मारत असताना अचानक तिचा भाऊ आदित्य येऊन संतापाच्या भरात हॉकी स्टीकने त्याच्या हातांवर आणि पायांवर वार केला. हल्ल्यात लावण्य गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकीही दिल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर अलिबाग पोलिस ठाण्यात गु. र. नं. 189/2025 भा. दं. वि. कलम 118 (1), 211 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत ठाकूर करत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्णपणे प्रेमसंबंधातील वैयक्तिक द्वेषातून घडल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे वरसोली किनाऱ्यावर खळबळ माजली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून, तपास पोलीस कडून कसून सुरू आहे.

हेही वाचा :

विकास पहाटेच्या दर्शनाने माओवाद्यांची शरणागती!
19 संघाची जागा T20 World Cup 2026 साठी झाली पक्की…
कॅन्सरवर Google AI नं शोधली नवी उपचार पद्धती…