कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

गरीब शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाज यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकडे झालेले दुर्लक्ष, व्यापारी आणि दलाल यांच्याकडून खुलेआमपणे सुरू असलेले आदिवासी समाजाचे शोषण, याच्या एकत्रित परिणामातून सुरू झालेली चळवळ म्हणजे नक्षलवाद ! पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग खोऱ्यातील नक्षलबारी नामक गावातून ही सशस्त्र चळवळ उभी राहिली म्हणून तिला नक्षलवाद असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील चार(development)जिल्ह्यात पसरलेली ही चळवळ संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असून नक्षलवाद्यांनी तथा माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करावे असे आवाहन केले गेले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. हा प्रतिसाद वाढत गेला तर नजीकच्या काळात माओवाद इतिहास जमा होईल.नक्षलवाद प्रभावित जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातील माओवादी चळवळ संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक आणि विश्वासात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. त्याची फलनिष्पत्ती म्हणून (development)बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे 60 पेक्षा अधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी शस्त्रे खाली ठेवली. ज्याच्यावर राज्य शासनाने सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते तो कमांडर सोनू उर्फ भूपती याच्यासह त्याच्यासाठीदारांनी समारंभपूर्वक आत्मसमर्पण करून शस्त्रे खाली ठेवली. नजीकच्या काळात महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त चार जिल्ह्यातील माओवादी चळवळ इतिहास जमा होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.


नक्षलवादी चळवळीचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील काही भागात बिडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या तेंदू पत्त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तथापि या तेंदु पत्त्याला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर मिळत नाही किंबहुना दलालांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते.शेतकरी आणि आदिवासींच्या या शोषणाला विरोध करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी चारो मुजुमदार,कानू संन्याल आणि जंगल संथाल या तिघांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली सशस्त्र चळवळ म्हणजे नक्षलवाद होय. गरीब शेतमजूर, शेतकरी आणि आदिवासी यांच्या दुर्दशेलाभांडवलशाही धोरण कारणीभूत आहे. त्याला विरोध करावयाचा असेल तर माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीला पर्याय नाही अशा तत्त्वज्ञानातून कम्युनिस्टंनी ही चळवळ सुरू केली. नक्षलवादी गावात सोनू वांगडी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या तिरकमठ्याच्या माध्यमातून एका आदिवासी तरुणांनी केल्यानंतर या चळवळीसाठी पोषक वातावरण तयार झाले.


मुळातच एका सार्वभौम सत्तेसमोर मुठभर लोकांनी सुरू केलेली कोणतीही चळवळ फार काळ टिकत नाही. माओवाद्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा वगैरे राज्यात काही जिल्हे आपल्या विचारांनी प्रभावित केले होते.तथापि केंद्र आणि राज्य शासनाने कठोर पाऊले उचलण्याबरोबरच संबंधितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महाराष्ट्रात अनेक माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यांचे उत्तम प्रकारे पुनर्वसन केले. शब्दांचे पुनर्वसन उत्तम प्रकारे होत असल्याचे पाहिल्यानंतर इतरांना आत्महत्या समर्पण करण्याची उत्तेजना मिळाली.नजीकच्या काळात किमान एक लाख नोकऱ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. या भागात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना 95% नोकऱ्या भूमिपुत्रांना देण्याच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत.भारतीय संविधान स्वीकारले तर आपले कल्याण होईल असे वातावरण तयार झाल्यानंतर माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमध्ये माओ विचारधारा मुक्त वातावरण तयार होण्यास काहीच अडचण नाही.


सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जयप्रकाश नारायण यांनी आवाहन केल्यानंतर चंबळ च्या खोऱ्यातील खतरनाक दरोडेखोरांनी शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करली होती. त्यातील काहीजण (development)उदाहरणार्थ बँडिट क्वीन फूलन देवी, लालसिंग यांच्यासह शेकडो दरोडेखोरानी आत्मसर्पण केले होते. तर मुंबईतील हाजी मस्तान, करीम लाला, मनू नारंग,युसुफ पटेल , बाखिया,वरदराजन मुदलीयार, अरविंद ढोलकी या तस्करांनीही आपले अवैध व्यवसाय सोडून दिल्याची शपथ घेतली होती.नक्षलवाद्यांना, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यापूर्वीच झाले असते तर माओवादी चळवळ फोफावण्याआधीच गारद झाली असती. पण आता सुरुवात तर झाली आहे, हेही नसे थोडके.!

हेही वाचा :

फक्त 2 काळ्या मिरीचे 6 आश्चर्यकारक फायदे….
जसप्रीत बुमराहने मियां भाईची अशी उडवली खिल्ली…
शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा…