तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील वसतिगृहमध्ये(hostel) घडलेल्या अमानुष रॅगिंग आणि मारहाण प्रकरणी वडगाव पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा आणि राज्यात संतापाची लाट उसळली होती.

माहितीनुसार, 9 मार्च रोजी या निवासी शाळेतील वसतिगृहात(hostel) नऊ लहान विद्यार्थ्यांना पाच मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कमरेचा पट्टा, प्लास्टिक बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले होते. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार मोबाईलवर व्हिडीओमध्ये कैद झाला होता.
हा व्हिडीओ 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नागरिकांमध्ये आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तत्काळ चौकशीची मागणी करण्यात आली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.सध्या पोलिस तपासाद्वारे आरोपींच्या भूमिका आणि घटना कशी घडली, याबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा :
विकास पहाटेच्या दर्शनाने माओवाद्यांची शरणागती!
19 संघाची जागा T20 World Cup 2026 साठी झाली पक्की…
कॅन्सरवर Google AI नं शोधली नवी उपचार पद्धती…