मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा सरकारी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीदरम्यान घडलेल्या लज्जास्पद घटनेने राज्यभरात खळबळ माजली आहे. कार्यक्रमासाठी तयार होत असताना काही विद्यार्थिनींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ आणि फोटो गुपचूप काढण्यात(College) आले, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, चौथा आरोपी फरार आहे.

अटक केलेले तिन्ही युवक हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे. अटकेत असलेले आरोपी उमेश जोशी, अजय गौड आणि हिमांशू बैरागी हे २० ते २२ वयोगटातील असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश जोशी हा एबीव्हीपीचा शहर मंत्री असल्याचा दावा करत होता, मात्र घटनेनंतर त्याला संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ही घटना मंगळवारी घडली असून, प्रभारी मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी महाविद्यालयाच्या(College) सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चार तरुण खिडकीतून डोकावताना दिसले, ज्यातून या घटनेचा खुलासा झाला. अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मंदसौरचे पोलिस अधीक्षक विनोद मीणा यांनी सांगितले की, घटनेचा सखोल तपास सुरू असून चौथ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थिनींमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा :

लवकरच येतोय Nothing Phone 3a Lite! BIS वर झाला मोठा खुलासा, किंमत सर्वात कमी..
मैदानावरील या वर्तनाबद्दल खेळाडूवर आयसीसीची कडक कारवाई..
सुनावणी राहिली बाजूला वकील करत राहिला महिलेला KISS; दिल्ली उच्च न्यायालयचा Video Viral