दिल्ली उच्च न्यायालयाच्या (High Court)व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले. या ऑनलाईन सुनावणीवेळी कॅमेरा चालू ठेवत चुंबन घेतले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र रोष व्यत्त केला जात असून वकीलाच्या वर्तनामुळे संताप व्यक्त होत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. सुनावणी सुरु होणार असताना हा वकील सुनावणीकडे कोणतेही लक्ष देत नव्हता. यावेळी त्यांने महिलेचे चुंबन घेतले. याचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला. या घटनेमुळे वकीलाच्या व्यावसायिक वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना एका खटल्याच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान घडली आहे, जी न्यायालयीन प्रोटोकॉलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालविली जात होती.

ही घटना मंगळवारी घडली आणि न्यायालयाचे(High Court) कामकाज सुरू झाले नव्हते आणि लोक न्यायाधीश येण्याची वाट पाहत होते. फुटेजमध्ये वकील त्याच्या खोलीत कोर्टाच्या पोशाखात बसलेला दिसतो, कॅमेऱ्यापासून थोडा दूर उभा आहे, फक्त त्याच्या चेहऱ्याची बाजू दिसत आहे. साडी घातलेली एक महिला त्याच्या समोर उभी असल्याचे दिसते. त्यानंतर वकील तिचा हात धरून तिला जवळ ओढताना दिसतो. ती महिला संकोच करत असल्याचे दिसते आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, परंतु ती मागे हटण्यापूर्वी वकील तिला एक धक्का देतो. व्हिडिओमधील वकील आणि महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाला असून याची नवराष्ट्र पुष्टी करत नाही.

वडीलाचा हा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिले आहे की, “किती लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे एकाने लिहिले आहे. तर तो इतरांसारखाच वर्क फॉर्म होम करताना सापडला आहे, असे एका नेटकऱ्याने लिहिले. “डीएचसीच्या कामकाजात आता मनोरंजनाची पर्वणी मिळते. गंभीर निकालांपासून ते अप्रत्याशित कोर्टरूमच्या नाट्यमयतेपर्यंत, हा दररोजचा एक शो आहे! असे सर्व करायचे आहे तर वकील तरी कशाला बनायचे असे एका नेटकऱ्याने म्हटले. तर आणखी एक वापरकर्ता म्हणाला की, “न्याय आंधळा असू शकतो, पण आता तो मूक आणि चुकून कॅमेऱ्यावर देखील आहे,” असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे

हेही वाचा :

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता पेन्शन खातं होणार मालामाल…
कोल्हापूरातील वसतिगृह मारहाण प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल…
बहिणीला बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये पाहिलं, भावाला राग अनावर, हॉकी स्टिक काढली अन्…