आयसीसी महिला विश्वचषक 2025 सध्या भारताचा संघ आयोजन करत आहे. तर पुढील वर्षी भारताचा संघ हा पुरुष टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन करणार आहे. यामध्ये भारताचा संघ या त्याचे टायटल डिफेंड करताना दिसणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये टी20 विश्वचषक(World Cup) जिंकला होता. यामध्ये भारतीय पुरुष संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर भारताचे चार दिग्गज जडेजा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विन यांनी टी 20 क्रिकेटला अलविदा केला आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे टी20 संघाचे कर्णधारपद हे सुर्यकुमार यादव कडे सोपवण्यात आले आहे.

पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आतापर्यत 19 संघानी त्याची जागा पक्की केली आहे. बुधवार, १५ ऑक्टोबर हा दिवस नेपाळ आणि ओमानच्या संघांसाठी खास होता. नेपाळने सलग दुसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. नेपाळसोबतच ओमाननेही भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२५ च्या टी२० विश्वचषकात स्थान मिळवले. नेपाळ आणि ओमानने आशिया आणि आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून या मेगा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. अशाप्रकारे, २० पैकी १९ संघ या वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.

गुरुवारी युएईने सामोआविरुद्ध विजय मिळवला आणि युएईने जपानविरुद्ध सामना खेळला, त्यामुळे ओमान आणि नेपाळ हे संघ टॉप थ्रीमध्ये स्थान मिळवतील हे आता निश्चित झाले आहे. सुपर सिक्स सामन्यांपूर्वी आयसीसीने त्यांची पात्रता निश्चित केली. युएई आणि कतारविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवणाऱ्या नेपाळने आतापर्यंत गट टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. दीपेंद्र सिंग ऐरीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून युएईविरुद्ध विजयावर शिक्कामोर्तब केले.

ओमान आणि नेपाळ टी-२० विश्वचषकासाठी(World Cup) पात्र ठरले आहेत, परंतु युएई, जपान, कतार आणि सामोआ अजूनही स्थानासाठी लढत आहेत. जो संघ पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवेल त्यालाही या मेगा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. यासह, फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणाऱ्या सर्व २० संघांची घोषणा केली जाईल. नेपाळ संघ चांगली कामगिरी करत आहे, याचा पुरावा म्हणजे नेपाळ सलग दुसऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणार आहे. अलीकडेच, विश्वचषकात खेळणाऱ्या आफ्रिका पात्रता संघांचीही घोषणा करण्यात आली.

हेही वाचा :

फक्त 2 काळ्या मिरीचे 6 आश्चर्यकारक फायदे….
जसप्रीत बुमराहने मियां भाईची अशी उडवली खिल्ली…
शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा…