एसटी बॅंक (ST Bank)राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ त्यांची अंडी करण्यात आल्याचे सदावर्ते यावेळी म्हणाले.. ते लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला गेले होते. त्या लाडक्या बहिणी कोण? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असेल. पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची असून ती अविवाहीत आहे. तिला मध्यरात्री त्रास दिला जायचा. तिला फोन करायचा. अत्याचारापर्यंत मजल गेली. आम्ही कोणाचे नाव घेणार नाही.

दुसरी बहीण वंजारी समाजाची आहे. तिला अपशब्द वापरले. विशाखाच्या गाईड लाईनचे उल्लंघन केलं. तिसरी बहीण आदिवासी समाजाची आहे. पुराव्यानिशी आता सर्व समोर आलाय, असेही त्यांनी सांगितले.एसटी बॅंक(ST Bank) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एफआयआरमधील गुन्हे गंभीर आहेत. विनयभंग, आदिवासी अॅट्रॉसिटीचा उल्लेख एफआयरमध्ये आहे. मुंबई महानगरात ही घटना घडल्याचे सदावर्ते म्हणाले.

पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयर केलाय. 7 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते अशी गंभीर कलम पोलिसांनी लावली आहेत. त्याचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. त्यांनी थातूरमातूर तक्रार केल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. एसटी बैठकीत अडसूळ गटाने सदावर्ते गटावर बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला, ज्यात १२५ कर्मचाऱ्यांची भरती पैसे देऊन करण्यात आली आणि १२ कोटींच्या सॉफ्टवेअरसाठी ५२ कोटी खर्च केल्याचा दावा आहे.

याशिवाय, सदावर्ते गटातील संचालकांनी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा आरोपही झाला, ज्यामुळे शाब्दिक वाद हाणामारीत बदलला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबईतील वाहतूक भवनात ही बैठक बोलावण्यात आली होती. यात गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना (शिंदे) गटातील आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचे संचालक उपस्थित होते. बैठक बोनस वाटपासारख्या विषयांसाठी होती, पण राजकीय आणि वैयक्तिक मतभेदांमुळे ती वादळी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर बाहेरून लोक बोलावून हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बैठकीचा रेकॉर्डिंग करण्यावरून वाद सुरू होतो. एक संचालक म्हणतो, “ही संचालक मंडळाची बैठक आहे, याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये.” विरोध झाल्यावर तावातावाने उठलेला व्यक्ती बाटली फेकून मारतो. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडतात, हाताला लागेल त्याची फेकाफेक होते, कपडे फाडले जातात आणि प्रचंड शिवीगाळ सुरू होते. व्हिडिओत महिलांचा आणि बाहेरील लोकांचा सहभागही दिसतो.

वाद फ्रीस्टाइल मारामारीत बदलला, ज्यात लाथा-बुक्के, तुडवणे आणि शर्ट फाटेपर्यंत झाली. सदावर्ते गटाने बाहेरून महिला आणि पुरुष आणल्याचा आरोप अडसूळ गटाने केला, तर सदावर्ते गटाने उलट आरोप केले. यात ५ ते ६ जण जखमी झाले, ज्यात किरकोळ दुखापतांपासून रक्तबंबाळ होण्यापर्यंत स्थिती आहे. बैठक अर्धवट सोडून देण्यात आली आणि दोन्ही गट पोलीस ठाण्याकडे गेले.

हेही वाचा :

जसप्रीत बुमराह भडकला, विमानतळावर नेमकं काय घडलं?
कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले अन्…..
लवकरच येतोय Nothing Phone 3a Lite! BIS वर झाला मोठा खुलासा, किंमत सर्वात कमी..