राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदार यादीत झालेल्या अनियमिततेबाबत विरोधी पक्षांकडून सरकारवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक आश्चर्यचकित करणारा खुलासा करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड दाखवत निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले, “आता डोनाल्ड ट्रम्प तात्या आमचे राशिनचे मतदार झाले आहेत. त्यांचं आधार कार्ड तयार झालं आहे. काही दिवसांनी ते इथून निवडणुकीलाही उभे राहतील.” त्यांनी आरोप केला की, मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बनावट नावांची भर पडली असून, घराचे खोटे क्रमांक, लिंगात बदल, चुकीचे पत्ते आणि डुप्लिकेट आधार क्रमांक अशा गंभीर त्रुटी करण्यात आल्या आहेत. “हे सर्व अधिकारी डोळे झाक करून करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत एवढी मोठी वाढ कशी झाली? हे सर्व बनावट नोंदींमुळेच शक्य झाले आहे. जसे डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले तसेच अनेकांनी बनावट पद्धतीने आधार व मतदान कार्ड तयार केले असावेत.” त्यांनी यावेळी सरकारकडे (political)डिजिटल मतदार याद्या पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी होऊ शकेल.या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मतदार याद्यांमधील अनियमिततेवरून सरकारला घेरण्याचे धोरण स्पष्ट केले असून, आगामी निवडणुका वादग्रस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा :

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत भूकंप?; नव्या लेटरबॉम्बने खळबळ
‘महिलांना लैंगिक त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं’; सदावर्तेंचा खळबळजनक दावा..
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही…