जगातील सर्वात यशस्वी जलतरणपटूंपैकी एक असलेल्या एरियार्न टिटमसने अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. चार वेळा ऑलिंपिकमध्ये(Olympic) गोल्ड मेडल जिंकलेल्या एरियार्नने गुरुवारी इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे तिच्या निवृत्तीची घोषणा केली. तिच्या म्हणण्यानुसार, “आयुष्यात पोहण्यापेक्षा इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत,” आणि ती आता आयुष्यातील नवीन आव्हाने स्वीकारण्यास उत्सुक आहे.

एरियार्न टिटमसने सांगितले की, लहानपणापासून तिला पोहण्याची प्रचंड आवड होती. मात्र काही काळ पोहण्यापासून दूर राहिल्यावर तिने जाणले की आयुष्यात आणखीही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तिला पुढे घेऊन जाणार आहेत. तिच्या या निर्णयाने जलतरण चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि धक्का निर्माण केला आहे.
मागील वर्षी पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये एरियार्नने ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये अमेरिकेच्या केटी लेडेकी आणि कॅनडाच्या समर मॅकिन्टोशवर मात करत गोल्ड मेडल पटकावले आणि नवीन विश्व रेकॉर्डही स्थापित केला. तिच्या करिअरमध्ये एकूण ३३ आंतरराष्ट्रीय पदके आहेत, ज्यात ४ ऑलिंपिक गोल्ड, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक तसेच ४ जागतिक चॅम्पियनशिप जिंकलेली आहेत. तिने महिला जलतरणात नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.

तिच्या निवृत्तीबाबत प्रशिक्षक आणि चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये(Olympic) ती परत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवरून असे दिसते की तिने आता नवीन मार्ग निवडला आहे. २५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण आयुष्यातील नवीन इनिंगसाठी ती उत्सुक असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य..
‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; ‘या’ बँकेवरचे सर्व निर्बंध हटवले…