मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेली निवडणूक(Election) आयोग आयुक्तांची भेट, त्यांच्यापुढं मांडलेले प्रश्न आणि निवेदनं, यानंतर मविआनं घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात झालेला धक्कादायक खुलासा पाहता राज्यात सध्या निवणूक प्रक्रियेवरच जनसामान्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमध्य़े असणारा घोळ समोर येत असल्या कारणानं सातत्यानं होणारे हे खुलासे पाहता आता आगामी निवडणूक जड जाणारा याची सरकारला जाणीव असून, याच कारणास्तव राज्यात आगामी काळात निवडणुका होतील की नाही, याबाबतच शंका असल्याचं वक्यव्य एका बड्या नेत्यानं केलं.

‘सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाचं वातावरण असून, प्रत्येक टप्प्यावर सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून मतदान घेण्यात आलं आहे. मात्र आता मतदार जागरूक झालाय,त्यामुळे या निवडणुका सरकारला जड जाणार याची कल्पना असल्यामुळे निवडणुका होतील की नाही यावर शंका आहे’, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला . निवडणुकीबबात केलेल्या त्यांच्या वक्तव्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(Election) आम्ही आघाडी म्हणून कधीही लढलो नाही…. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या चर्चेमुळे आघाडीत मिठाचा खडा पडेल किंवा अन्य चर्चा व्यर्थच आहेत असं त्यांनी किमान शब्दांत स्पष्ट केलं. राज ठाकरेंनी 2017 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळं जर तेव्हा स्वतःचा पक्ष असतानाही काँग्रेसचा प्रचार करायला राज ठाकरे चालले तर आता का चालणार नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांनी पक्ष चोरले, पक्षचिन्हं, निशाणी चोरली,आमदार चोरले,नेते चोरले….आता काय चोरायचं म्हणून मतदार चोरले. त्यामुळं राज्यात असे चोर ठेवायचे का, हा विचार मतदारांनी करण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली. दरम्यान इथं ठाकरेंची सेना निवडणुकीसाठी सज्ज असतानाच तिथं शिंदेंच्या सेनेकडून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये महायुतीत निवडणुका लढण्याची शक्यता कमी असल्याचा सूर शिंदेंच्या पक्ष बैठकीत आळवला गेला. ज्यामुळं युतीत शक्य नसल्यास स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना या बैठकीदरम्यान देण्यात आल्याचं म्हटलं गेलं. बुधवारी एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक घेतल्यानंतर हे वृत्त सूत्रांमार्फत समोर आलं.

मागील काही दिवसांपासून मविआच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोग आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्यापुढे मतदार यादीतील घोळाबाबत प्रश्न मांडले आणि निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले, ज्यामुळे राज्यात निवडणूक प्रक्रियेवर जनसामान्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.मतदार यादीतील सातत्यपूर्ण घोळ आणि खुलासे यामुळे सरकारला आगामी निवडणुका जड जाणार याची जाणीव आहे. यामुळे राज्यात निवडणुका होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भास्कर जाधव म्हणाले, “यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही आघाडी म्हणून लढलो नाहीत.” राज ठाकरे यांच्या सहभागामुळे आघाडीत मिठाचा खडा पडेल अशा चर्चा व्यर्थ आहेत.

हेही वाचा :

डोनाल्ड ट्रम्प रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी; थेट आधार कार्डच आलं समोर…
गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स
सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?