आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ घोंगावू लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये(Mahavikas Aghadi) मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत असून, या वादाची धग आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसपक्षश्रेष्ठींना एक पत्र लिहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार केल्याचे समजते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यास सपकाळ यांचा तीव्र विरोध असल्याचे राऊत यांनी या पत्रात नमूद केले आहे. मात्र, राऊत यांच्या या थेट दिल्लीतील हस्तक्षेपामुळे काँग्रेस हायकमांडमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेमुळे त्यांच्याशी युती केल्यास पक्षाचा पारंपरिक मतदार दुरावेल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. सपकाळ यांनी या विषयावर चर्चा करून कळवतो असे आश्वासन दिलेले असतानाही, राऊत यांनी थेट दिल्लीत पत्र लिहिल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत.
या संपूर्ण वादावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “मनसेच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नाही, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे सांगत त्यांनी या केवळ माध्यमांतील चर्चा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे मनसेच्या आघाडीतील प्रवेशाची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
हा वाद जर आणखी चिघळला, तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत तिसरी आघाडी उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील या नव्या ठाकरे बंधूंच्या आघाडीत सामील होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. त्यामुळे राऊत यांचे हे एक पत्र महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारे ठरू शकते.
हेही वाचा :
महापालिकेवर सत्ता व महापौर महाविकास आघाडीचाच — पत्रकार परिषदेत ठाम विश्वास व्यक्त
विराट कोहलीचा मोठा निर्णय; ना अनुष्का, ना मुलं…’या’ व्यक्तीच्या नावावर केली प्रॉपर्टी
OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय; राज्य सरकारला मोठा धक्का