राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, पवार कुटुंबाने यावर्षी दिवाळी(Diwali) साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कुटुंबीयांच्या काकू सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर करत सांगितले की, भारती पवार त्या कुटुंबासाठी आईसमान होत्या आणि त्यांच्या निधनामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी व पाडव्यानिमित्त होणारी सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे.

भारती पवार यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले असून त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्या गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ आजारी होत्या आणि मार्च महिन्यात उपचारादरम्यान त्यांची (Diwali)प्राणज्योत संपली. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांनी भावनिक वातावरण लक्षात घेऊन दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी सर्वाना शुभेच्छा देत, दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी कामना केली आहे.

हेही वाचा :

महापालिकेवर सत्ता व महापौर महाविकास आघाडीचाच — पत्रकार परिषदेत ठाम विश्वास व्यक्त
विराट कोहलीचा मोठा निर्णय; ना अनुष्का, ना मुलं…’या’ व्यक्तीच्या नावावर केली प्रॉपर्टी
OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय; राज्य सरकारला मोठा धक्का