इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी शहरात आगामी महानगरपालिका(Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी खासदार आणि आमदार शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नासह इतर नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने, शहरातील जनतेत प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी म्हटले की, “सत्ताधारी पक्षाकडे आता बोलण्यासारखा एकही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळेच भाजप आपल्या मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांना कमकुवत करून, त्यांना पक्षात सामील करून घेण्याचा केविलवाणा प्रकार करत आहे. मात्र जनता सर्वकाही उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.”
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सत्ताधारी गटांतील काही पदाधिकाऱ्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर टीका करत “हा पक्षप्रवेश म्हणजे मित्रपक्षांचा संपवण्याचा डाव” असल्याचा आरोप केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांनी सांगितले की, “जनता आता सत्ताधाऱ्यांचा असंतोष व्यक्त करण्यास तयार आहे. योग्य वेळी लोकशाही मार्गाने जनतेची प्रतिक्रिया उमटेल आणि इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचाच होईल.”
मॅचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी आमदार आणि खासदारांवर थेट शाब्दिक प्रहार करत म्हटले की, “शहरातील पाणीप्रश्नावर उत्तर द्यावे. आमदार आवाडे यांनी केवळ कुपनलिका (Municipal Corporation)खणून जनतेची दिशाभूल न करता सुळकुड पाणी योजना तात्काळ कार्यान्वित करावी. या प्रश्नावर मोर्चा काढला तर आम्ही त्यांच्यासोबत सहभागी होऊ.”

तसेच प्रकाश मोरबाळे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व प्रलंबित प्रश्नांवरच महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल. शहराच्या विकासासाठी जनतेच्या बाजूने ठाम भूमिका घेऊ.” या पत्रकार परिषदेत संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, मलकारी लवटे, सदा मलाबादे, अमरजित जाधव, प्रमोद खुडे, बाबासो कोतवाल, रणजित जाधव, वसंत कोरवी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
‘अविवाहीत लाडक्या बहिणींना मध्यरात्री….’ गुणरत्न सदावर्तेंचे खळबळजनक आरोप…
जसप्रीत बुमराह भडकला, विमानतळावर नेमकं काय घडलं?
कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले अन्…..