राजस्थानमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेच्या मृत्यूने सासूला जोरदार धक्का बसला आणि एवढेच नाही तर क्षणातच तिचाही मृत्यू (death)झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना अजमेर जिल्ह्यातील सरवाड कसब्यात घडली आहे.सुनेचे नाव अनिता तर सासूचे नाव अन्नपूर्णा देवी (वय 70) असे आहे. अनिताचा मृत्यू आजाराने झाला. घरात अनिताचा मृतदेह पोहोचताच त्यांच्या सासू अन्नपूर्णा देवी या सुनेला पाहून शोकाकुल झाला. त्या सुनेच्या पार्थिव देहाजवळ बसून रडत होत्या. घरच्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांना भोवळ आली आणि ते पडल्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. एकाच दिवशी सासू- सुनेच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अन्नपूर्णाया देवी आणि अनिता यांचे नाते अतिशय प्रेमळ होते. दोघी एकमेकांशी आई- मुलीसारख्या राहायच्या. त्यामुळे सुनेच्या मृत्यूचा(death) धक्का अन्नपूर्णा देवी सहन करू शकल्या नाहीत. गुरुवारी सकाळी या दोघींची अंतयात्रा एकाच घरातून एकाच वेळी निघाल्या. गावातील सर्वांनी अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या घटनने संपूर्ण सरवाड गावात शोककळा पसरली असून, सर्वजण या आई-मुलीसमान सासू-सुनेच्या एकमेकींबद्दलच्या प्रेमाची चर्चा करत आहेत.

राजस्थान येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह दुःखाच्या तळघरात पुरल्याचे समोर आले आहे. त्याने सहा दिवस मृतदेह लपवून ठेवल्यानंतर, त्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आता हत्येमागचा हेतू शोधत आहेत. ही घटना राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरला रात्री अरविंद रोट याने त्याची ३० वर्षीय बायको चेतनाची हत्या केली. हत्येननंतर त्याने २९ सप्टेंबर रोजी त्याने दुकानाच्या तळघरात एक मोठा खड्डा खोदला. त्यात तनाला दफन केलं. त्यानंतर सहा दिवस त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली.

पण त्यांनतर त्याचं मन खायला लागलं. त्याने 2 ऑक्टोबर रोजी चौरासी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी खोदकाम करून डेडबॉडी ताब्यात घेतली. यावेळी दुकानाबाहेर अख्खं गाव जमा झालं होतं.

हेही वाचा :

भारतात Triumph Speed Triple 1200 RX लाँच, किंमत…
‘वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिलेले…’; गर्भपाताबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न