‘बिग बॉस’ला टक्कर देणाऱ्या अश्नीर ग्रोवरच्या ‘राईज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री कुब्रा सैत सध्या तिच्या एका वैयक्तिक खुलाशामुळे चर्चेत आहे.वयाच्या तिसाव्या वर्षी घेतलेल्या गर्भपाताच्या निर्णयावर आता मोकळेपणाने भाष्य केले आहे(Pregnant). त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता की चूक, याबद्दल मनात गोंधळ असला तरी, आज मागे वळून पाहताना तो निर्णय स्वतःसाठी योग्यच होता, असे तिने आत्मविश्वासाने म्हटले आहे.

एका ताज्या मुलाखतीत कुब्राने तिच्या त्यावेळच्या द्विधा मनस्थितीबद्दल सांगितले. ती म्हणाली, “त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि मला त्यातून बाहेर पडण्यासाठी व विचार करण्यासाठी बराच वेळ मिळाला. आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा तुम्ही गोंधळात पडता. कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि समाज तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्यामुळे तुम्ही चूक आणि बरोबर काय आहे, यात अडकून पडता.”

आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना ती पुढे म्हणाली, “त्या क्षणी तुम्हाला कळत नाही की तुमचा निर्णय योग्य आहे की नाही. पण आज, मी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणू शकते की मी त्यावेळी घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्य होता. कारण मला माहित आहे की जरी मी काही चूक केली असती, तरी देव सगळं पाहत आहे आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले असते.”

यापूर्वीही कुब्राने या अनुभवाविषयी सांगितले होते. गर्भपातानंत(Pregnant)र तिला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान तिला प्रचंड रक्तस्राव आणि चिडचिड होत होती, पण त्यावेळी ती याबद्दल कोणाशीही बोलू शकली नव्हती, असेही तिने नमूद केले. ‘राईज अँड फॉल’च्या फिनालेनंतर कुब्राच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं
‘मी मागील 16 महिन्यापासून प्रेग्नंट, पण…’, सोनाक्षी सिन्हाची धक्कादायक कबुली