कोल्हापुरातून आलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ठरली आहे. सहा नृत्यांगणांनी(dancers) सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी हाताच्या नसा कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व नृत्यांगणा(dancers) कोल्हापुरात वास्तव्यास होत्या आणि दोन महिन्यांपूर्वी काही गुन्ह्यांखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोल्हापूर पोलिसांनी महिला सुधारगृहात ठेवले होते. मात्र, आज त्यांनी एकत्रितपणे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती महिला सुधारगृहातील कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले आणि नृत्यांगणांना रुग्णालयात हलवले.

सध्या त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा सखोल शोध घेतला जात आहे. या घटनेने कोल्हापूरमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका…
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर…
पराभव गृहीत धरून, त्याची कारणे शोधली जातात का?