कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषता मुंबई आणि आसपासच्या महापालिका निवडणुकीत कदाचित पराभव झाला तर त्याचे खापर कुणा यंत्रणाच्या माथ्यावर फोडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून विरोधी पक्ष आतापासूनच तयारीला लागलेले दिसतात. आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये(election) मतदार याद्या ह्या पूर्णपणे निर्दोष होत्या आणि गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून सदोष मतदार याद्या वापरल्या गेल्या आणि यापुढेही वापरल्या जाणार आहेत असे गृहीत धरून राज्यातले विरोधी पक्ष नेते बुधवारी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटले. मतदार यादी मधील घोळ हा आत्ताचा आहे असे नाही तर तो पूर्वीपासूनचा आहे.

एकाच घरात क्षमतेपेक्षा जास्त मतदार असणे, मतदारांची नावे चुकीची असणे, पुरुष मतदाराला स्त्रीलिंगी दाखवणे, महिला मतदाराचा उल्लेख पुरुष असा करणे, जिवंत मतदाराला मयत आणि मयत मतदाराला जिवंत दाखवणे, मतदारांचे फोटो असणे किंवा नसणे, घरचा पत्ता चुकीचा दाखवणे, दुबार मतदार(election) नोंदणी असणे, मतदाराच्या वयाचा उल्लेख चुकीचा असणे अशा कितीतरी चुका मतदार यादीत असतात आणि आहेत. मतदार यादी 100% निर्दोष असणे हा भारतीय लोकशाहीत चमत्कार वाटावा इतक्या पातळीवर मतदार याद्या सदोष असतात आणि हे आज घडत नाही तर आज पर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये हे घडलेले आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये अशाच प्रकारच्या असंख्य चुका आहेत. त्याच्यावर बोट ठेवून सर्व विरोधी पक्षाचे नेते बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना भेटले. मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात. त्या पूर्णपणे निर्देश असाव्यात. मतदार याद्या तयार करण्याचे काम सत्ताधाऱ्यांशी संबंध असलेल्या कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीने हेतूपूर्वक मतदार याद्यांमध्ये घोळ घातलेला आहे. जोपर्यंत मतदार यादीतील दोष काढून टाकले जात नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी निवडणूक आयुक्तांकडे या नेत्यांनी बुधवारी केली.

काँग्रेसचे हर्षवर्धन संकपाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आदि नेत्यांनीमतदार याद्यांवर घेतलेले आक्षेप योग्य आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. मानवी बुद्ध्यांकावर मात करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आलेले आहे. या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे वापर केला जातो आहे. अशावेळी लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मतदारांच्या याद्या सदोष असणे हा माहिती व तंत्रज्ञानाचा पराभव आहे असे म्हणता येईल.राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार याद्यांवर त्या अतिशय सदस्य असल्याचा ठपका पहिल्यांदा ठेवला आहे मात्र मतदार याद्यांचा घोळ जुना आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिये वेळी मतदार यादीतील घोळ पुढे येतो.

वास्तविक या संदर्भात मतदारांनी आता अधिक सतर्क असले पाहिजे. आपले नाव मतदार यादी मध्ये आहे, ते बिन चूक आहे, याची खात्री करण्याची संधी निवडणूक यंत्रणांकडून दिली जात असूनही तिचा उपयोग करून घेतला जात नाही हे आपले दुर्दैव आहे.मतदार याद्या नव्याने तयार करण्यात याव्यात, त्या शंभर टक्के निर्दोष असाव्यात आणि त्याशिवाय निवडणूक घेतली जाऊ नये ही मागणी निवडणुका आयुक्तांकडून मान्य केली जाण्याची शक्यता नाही. कारण आता ती वेळ निघून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत झाल्या पाहिजेत. हा आदेश पाळायचा असेल तर आहे त्या सदोष मतदार याद्या या निवडणुकीत वापराव्या लागतील.

इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी काही महिन्यापूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आक्षेप घेतले होते तेव्हाच महाराष्ट्रातील या नेत्यांनी निर्दोष मतदार यांसाठी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आग्रह धरणे आवश्यक होते.पण तसे झाले नाही.सदोष मतदार याद्या हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे असा नाही पण तरीही तो जणू पहिल्यांदाच घडतो आहे असे समजून त्यावर आक्षेप नोंदवला जातो आहे.सध्याच्या सदोष असलेल्या मतदार याद्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्यात अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांना यश मिळाले नाही तरकोणत्या यंत्रणेवर त्याचे खापर फोडायचे यासाठीची विरोधी पक्षांकडून कारणांची शोध मोहीम तर सुरू नाही ना?

हेही वाचा :

दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य..
‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; ‘या’ बँकेवरचे सर्व निर्बंध हटवले…