डीकेएएससी मध्ये अमली पदार्थ प्रतिबंध दिनानिमित्त व्याख्यान संपन्न…पोलीस विभाग आणि महाविद्यालयाच्या संयुक्त कार्यक्रमात तज्ञांचे मार्गदर्शन

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स(DKASC), सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी आणि महाविद्यालयातील एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ प्रतिबंध दिन या निमित्ताने तज्ञांच्या व्याख्यानाने प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. दिलीप पवार व सहायक पोलीस निरीक्षक मा. विजय गोडसे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. संदेश पाटील म्हणाले, “मागील काही दशकांमध्ये समाज जीवनात झालेला बदल आणि चंगळवादी जीवनशैलीबद्दल तरुणांच्या मनात निर्माण झालेल्या औत्सुक्य आणि याच औत्सुक्यातून व्यसनाधीनता हे सूत्र समाजातल्या तरुणांसाठी घातक आहे.

आपण व्यसनी होऊच नये किंबहुना व्यसन लागले असल्यास त्यातून कसे बाहेर पडता येईल. या दोन्ही पातळीवर कृतीशील कार्यक्रमाच्या(DKASC) माध्यमातून हा समाज निर्व्यसनी करता येईल.” तर मानसोपचार तज्ञ सौ. भाग्यश्री देवमोरे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून व्यसनामुळे निर्माण होणारे गंभीर प्रश्न आणि देशाच्या भवितव्यासमोरील असणाऱ्या समस्या याची नेमकेपणा मांडणी केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. दिलीप पवार यांनी आपल्या मनोगतातून पोलीस विभाग हा नेहमीच तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून उभा आहे आणि राहील. देशाचे भवितव्य आपल्या खांद्यावर आहे याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. अशा आशयाचे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी सर्वच मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेत व्यसनापासून दूर राहत निर्व्यसनी कुटुंब, निर्व्यसनी समाज आणि निर्व्यसनी राष्ट्र बनवण्याच्या साठी आपल्या प्रत्येकाची भूमिका समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. ए. यादव यांनी केले. एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट. विनायक भोई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी डॉ. एस. टी. इंगळे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वसंत घुगे यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार लेफ्ट. विनायक भोई यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.

हेही वाचा :

वणवा पेटण्यास सुरूवात, हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा

३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार

‘सरळसरळ डिझाईन कॉपी करून..’, प्राडा ब्रँडने कोल्हापुरी चपलेली नक्कल केल्याने संभाजीराजे छत्रपतींचा संताप