बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन त्याच्या वयाच्या 40 व्या वर्षी झाले. त्याच्या या निधनाने सर्वांचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता बिग बॉस 13 ची वाइल्ड कार्ड प्रसिद्ध स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. तिने तिच्या अखेरचा श्वास ४२ व्या वर्षी सोडला. तिच्या या निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या(Actress) निधनानंतर सध्या तिची एक सोशल मिडीया पोस्ट व्हायरल होत आहे.

शेफाली जरीवाला(Actress) उर्फ काटा लगा या गाण्यामधुन तिला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बाॅस 13 मध्ये सामील झाली होती यामध्ये ती वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणुन सहभागी झाली होती. ती बिग बाॅसच्या घरामध्ये सामील झाल्यानंतर पहिल्याच आठवठ्यामध्ये तीला घराचे कर्णधारपद मिळाले होते, यानंतर सलमान खानने देखील तिचे आणि तिने खेळलेल्या खेळाचे कौतुक केले होते. तिचा दुसरा पती पराग त्यागी हा देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे.
Thinking of you today mere dost @sidharth_shukla ❤️ pic.twitter.com/sZNv6Ft1hG
— Shefali Jariwala (@shefalijariwala) September 2, 2024
पती पराग त्यागीसोबत तिने डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिये’ मध्ये भाग घेतला. ४२ वर्षीय अभिनेत्री शेफाली जरीवालाची एक्सवरील शेवटची पोस्ट सिद्धार्थ शुक्लासोबत आहे. शेफालीने सप्टेंबर २०२४ मध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या पुण्यतिथीनिमित्त ही पोस्ट शेअर केली होती. बिग बॉस १३ चा सह-कलाकार सिद्धार्थ शुक्लाचेही सप्टेंबर २०२१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सिद्धार्थला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली होती.
शेफाली जरीवालाने २००४ मध्ये आलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या बॉलिवूड चित्रपटात सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम केले होते. शेफाली जरीवालाने एएलटी बालाजीच्या ‘बेबी कम ना’ या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदेसोबत काम केले होते. शेफाली तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकसाठी इंस्टाग्रामवर सक्रिय होती. तिचा माजी पती हरमीत सिंग हा मीट ब्रदर्सचा संगीतकार आहे, ज्याच्यापासून तिने २००९ मध्ये घटस्फोट घेतला होता. ती तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत होती.
हेही वाचा :
आंगणवाडी भरती 2025: १९,००० हून अधिक पदांसाठी सुवर्णसंधी, १२वी उत्तीर्ण महिलांना मोठा दिलासा
मोठी बातमी! महाराष्ट्र भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; दोन नावे आघाडीवर