बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरु आहे. नुकतीच सोनाक्षी सिन्हाने आपला पती झहीर इक्बालसोबत विक्रम फडणवीसच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त आयोजित पार्टीला हजेरी लावली. यानंतर पुन्हा एकदा सोनाक्षीच्या प्रेग्नन्सीची(pregnant) चर्चा रंगली आहे.सोनाक्षी सिन्हा यावेळी अनारकली सूट घातला होता. तसंच पोटाभोवती दुपट्टा होता. यावरुन ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका निर्माण झाली.

पार्टीत फोटोग्राफर्सना पोझ देताना झहीरने सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवत, बेबी बम्प आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला.पण सोनाक्षीने त्याला लगेच बाजूला सारलं आणि नावाने हाक मारली ज्यानंतर दोघे हस लागले. यानंतर झहीरने आम्ही फक्त मस्करी करत आहोत असा दावा केला. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दरम्यान या जोडप्याच्या गरोदरपणाच्या चर्चांची बातमी पहिल्यांदाच आली नाही. जूनमध्ये, अशी चर्चा होती की हे दोघे त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत. त्यावेळी सोनाक्षी सिन्हाने त्यावर भाष्य केलं होतं.

“तुम्ही काहीही केलं तरी लोक जे म्हणायचं ते म्हणणार आहेत. जर मी म्हणालो की मी पांढरा पोशाख घातला आहे, तर कोणीतरी म्हणेल ‘नाही, तो काळा आहे.’ तुम्ही जे बोलता त्याला आव्हान देण्यासाठी कोणीतरी नेहमीच तिथे असेल, म्हणून तुम्ही तुमचे आयुष्य पुढे चालू ठेवा. तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही”, असं तिने सांगितलं होतं.दरम्यान सोनाक्षीने सध्याच्या चर्चांनंतर इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा गरोदरपणाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.सोनाक्षीने तिच्या विनोदी शैलीत इंस्टाग्रामवर दिवाळी पार्टीतील तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. तसंच मागील 16 महिन्यांपासून आपण प्रेग्नंट आहोत असंही उपहासात्मकपणे तिने सांगितलं आहे(pregnant).

तिने लिहिले, “मानवी इतिहासातील सर्वात जास्त काळ गरोदर राहण्याचा जागतिक विक्रम (आमच्या सुंदर आणि अति-बुद्धिमान माध्यमांनुसार 16 महिने आणि ती मोजली जात आहे) फक्त मध्यभागाभोवती हात ठेवून पोज दिल्याबद्दल. आमच्या प्रतिक्रियेसाठी शेवटच्या स्लाइडवर स्क्रोल करा… आणि नंतर या दिवाळीत चकित करत राहा.”थोडक्यात सोनाक्षी सिन्हाने आपण गरोदर नसल्याचं सागितलं आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे डेटिंग केल्यानंतर 23 जून 2024 रोजी लग्न केले.

हेही वाचा :

शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका…
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर…
पराभव गृहीत धरून, त्याची कारणे शोधली जातात का?