मुंबईतील अतिशय नामांकित अशा शिक्षण संस्थेतून हादरवणारी माहिती समोर आली असून, अतिशय किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये येथील विद्यार्थ्यांचे नग्न (Naked)व्हिडीओ चित्रीत करण्यात आल्याची बाब तपासातून समोर आली. मुंबईच्या अतिशय प्रतिष्ठीत अशा आयआयटीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांचे अंघोळ आणि शौचालयातील नग्नावस्थेतील चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक घडला आहे.

आयआयटीमधूनच शिक्षण पूर्ण केलेल्या 32 वर्षीय राहुल पांडे याला मोबाइलमध्ये चित्रीकरण करताना विद्यार्थ्यांनी पकडले. ज्यानंतर त्याचा मोबाइल तपासला असता त्यात असे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ(Naked)सापडले असून पवई पोलिसांनी सदर प्रकरणात तातडीनं गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.हा संपूर्ण प्रकार तेव्हा उघडकीस आला, ज्यावेळी आयआयटीच्या वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या काही विद्यास्थ्यांनी 14 क्रमांकाच्या विद्यार्थी वसतीगृहामध्ये काही संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि त्यांनी हा प्रकार, त्याबाबतची तक्रार वसति वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाकडे केली.
सुरक्षा रक्षकानं दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल पांडे हा आयआयटीचा माजी विद्यार्थी असून 2025 मध्येच त्याने इलेक्ट्रिक विभागातून एमटेक केलं. तो वसतीगृहात त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जात असे, शिवाय सध्या तो नोकरीच्या शोधातही होता, ज्यामुळं कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेसाठीही तो इथं येत होता. प्राथमिक माहितीनुसार काही कामानिमित्त तो एका अधिकाऱ्याच्या शिफारशीवरून दोन दिवसांच्या पासवर वसतिगृहात राहण्यासाठी आला होता.
तो इथं मित्राच्या खोलीवर राहिला आणि 12 ऑक्टोबरला काही विद्यार्थ्यांनी राहुलला शौचालयामध्ये चोरून व्हिडीओ काढताना पकडलं. सुरक्षारक्षकांनी वसतिगृह प्रशासनाला कळवल्यानंतर, त्यांनी पवई पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक स्तरावर विद्यार्थी आणि वसतीगृह सुरक्षा रक्षकही यासंदर्भातील तक्रार करण्यासाठी तयार नसल्याची माहिती एका प्रसिद्धव वृत्तसमुहानं प्रसिद्ध केलं आहे.
पुढं पोलिसांनी या प्रकरणात डोकावल्यानंतर आणि आयआयटीतील अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवर्यानंतर एफआयआर दाखल करत भारतीय दंडसंविधाना अन्वये कलम 66 (ई) (कोणाच्याही परवानगी/ सहमतीशिवाय खासगी दृश्य टीपणं, प्रसिद्ध करणं किंवा व्हिडीओ व्हायरल करणं) या IT कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मुंबईच्या प्रतिष्ठित आयआयटी बॉम्बे (पवई) संस्थेतील वसतिगृहात (हॉस्टेल क्रमांक 14) विद्यार्थ्यांच्या अंघोळ आणि शौचालयातील नग्नावस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. हे विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन असून, संस्थेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.आरोपीचे नाव राहुल पांडे, वय 32 वर्षे. तो आयआयटी बॉम्बेचाच माजी विद्यार्थी असून, 2025 मध्ये इलेक्ट्रिकल विभागातून एमटेक पूर्ण केले. सध्या तो नोकरीच्या शोधात असून, कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी संस्थेत येत होता.12 ऑक्टोबर 2025 रोजी हॉस्टेल क्रमांक 14 मध्ये काही विद्यार्थ्यांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्यांनी सुरक्षा रक्षकाकडे तक्रार केली.
हेही वाचा :
4 वी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
धनत्रयोदशीला करा ‘या’ वस्तूंची खरेदी, तुमच्या आयुष्यात होईल पैशांचा वर्षाव!
भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची…