धनत्रयोदशीचा सण(festival) कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीचा शुभारंभ धनत्रयोदशीनेच होतो. यावर्षी धनत्रयोदशीचा सण शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार असून, या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीच्या(festival) दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी आणि अमृत कलश प्रकट झाले, असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. म्हणूनच या दिवशी धन-आरोग्य-समृद्धीच्या उपासनेचा दिवस म्हणून तो साजरा केला जातो. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेमुळे घरात धन, संपत्ती, आणि सौख्याचा वास होतो.धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास वस्तू खरेदी केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि घरात सुख-शांती टिकून राहते, असं मानलं जातं.
कुबेर यंत्र :
धनत्रयोदशीला कुबेर यंत्र खरेदी करून घरात, दुकानात किंवा तिजोरीत ठेवावं. यामुळे संपत्ती वाढते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं.
मीठ :
या दिवशी मीठ विकत घेतल्याने गरिबी दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील नकारात्मक शक्ती कमी होतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू :
धनत्रयोदशीला तांब्याच्या भांड्यांची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. या धातूच्या वस्तूंमुळे आरोग्य सुधारतं आणि घरात सकारात्मकता वाढते. चांदीची भांडी खरेदी करणेही लाभदायक ठरते.
नवीन झाडू :
या दिवशी नवीन झाडू आणल्याने गरिबी आणि नकारात्मकता दूर होते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नवीन झाडूने घर स्वच्छ केल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते, असं मानलं जातं.
गणेश-लक्ष्मी मूर्ती :
धनत्रयोदशीला भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्या मूर्ती खरेदी करून त्यांची पूजा केल्यास घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. या दोघांच्या कृपेने जीवनात प्रगती आणि समाधान मिळतं.
धन-समृद्धीचा सण :
धनत्रयोदशी हा फक्त खरेदीचा नव्हे, तर आस्थेचा सण आहे. या दिवशी केलेले शुभ कार्य, पूजन आणि खरेदी हे वर्षभर आर्थिक प्रगतीचे दार उघडतात. त्यामुळे १८ ऑक्टोबरला या शुभ वस्तूंची खरेदी करून आपणही आपल्या आयुष्यात धन-समृद्धीचं स्वागत करा!
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांच्या एका निरोपाने काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
शाळेला लागली दिवाळीची सुट्टी – लहान मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू!
भली मोठी आहे हार्दिकच्या गर्लफ्रेंडसची यादी; त्यापैकी एकतर आहे युवा नेत्याची पत्नी..