दिवाळीचा सण गोडधोड पदार्थांशिवाय अपुरा वाटतो, आणि त्यात करंजीचं(Karanji) स्थान अत्यंत विशेष आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड सारणाने भरलेली करंजी प्रत्येकाच्या आवडीची असते. या दिवाळीत तुम्ही घरच्या घरी लेअर्ससह कुरकुरीत करंजी बनवण्याची खास रेसिपी आजमावून पाहू शकता.

सर्वप्रथम पीठ तयार करण्यासाठी मैदा, रवा, मीठ आणि मोहनासाठी गरम तेल मिसळून मऊ पण घट्ट पीठ मळून ३० मिनिटे झाकून ठेवा. सारणासाठी किसलेला नारळ, साखर, खसखस, सुके मेवे, वेलदोडा पूड आणि तूप परतून तयार करा. थर तयार करण्यासाठी मैदा आणि तूप गुळगुळीत पेस्टमध्ये मिसळा. पीठाचे गोळे करून तीन पोळ्यांची थर लावा, रोल करून १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर रोलचे छोटे तुकडे करून वर्तुळ लाटा, सारण भरा, अर्धचंद्र(Karanji) आकारात दुमडा आणि किनार कातरने सजवा. मध्यम आचेवर तेल गरम करून करंज्या तळा, ज्यामुळे सुंदर लेअर्स तयार होतील.
तळलेल्या करंज्या (Karanji)थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवता येतात आणि १५ दिवस खुसखुशीत राहतात. या रेसिपीत मोहनाचे प्रमाण वाढवल्यास करंजी अधिक कुरकुरीत होते, तसेच तेल फार गरम ठेवू नका, नाहीतर लेअर्स नीट तयार होत नाहीत. साखरेऐवजी हवे असल्यास गूळदेखील वापरता येतो. या खास रेसिपीमुळे दिवाळीच्या सणात गोडधोडींचा आनंद दुपटीने मिळेल.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांच्या एका निरोपाने काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
शाळेला लागली दिवाळीची सुट्टी – लहान मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू!
भली मोठी आहे हार्दिकच्या गर्लफ्रेंडसची यादी; त्यापैकी एकतर आहे युवा नेत्याची पत्नी..