हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटच्या मैदानापेक्षा सोशल मीडिया आणि रिलेशनशिप न्यूजमध्ये अधिक चर्चेत आहे. अलीकडेच त्याचे नाव माहिका शर्मासोबत जोडले गेले आहे आणि तो तिच्याशी डेटिंग करत असल्याचे समोर आले आहे. याआधी, पत्नी नतासा स्टनकोव्हीकला घटस्फोट दिल्यानंतरही त्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत जोडले जात होते. हार्दिकच्या प्रेम जीवनावर नजर टाकली असता, त्याने पूर्वीही काही प्रसिद्ध (girlfriends)व्यक्तींशी नातं ठेवले आहे.

२०१६ मध्ये तो मॉडेल लिशा शर्मासोबत डेट करत होता(girlfriends). त्यानंतर २०१७ मध्ये त्याचे नाव एलि अवरामसोबत जोडले गेले, जेव्हा दोघांचा अफेयर चर्चेत आला. त्यानंतर इशा गुप्ता आणि उर्वशी रौतेलासोबत हार्दिकचे नाव जोडले गेले, मात्र उर्वशीने याला फक्त मैत्रीचे नाते असल्याचे स्पष्ट केले. परिणीती चोप्रासोबतही त्याचे नाव एका गैरसमजात चर्चेत आले होते, परंतु नंतर ते केवळ अफवा असल्याचे समोर आले.

अशाप्रकारे हार्दिक पांड्याचे प्रेम जीवन नेहमीच मीडिया आणि चाहत्यांच्या लक्षात राहिले आहे, आणि सध्या माहिका शर्मासोबतचे नाते त्याला पुन्हा चर्चेत आणत आहे.
हेही वाचा :
भारतात Triumph Speed Triple 1200 RX लाँच, किंमत…
‘वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिलेले…’; गर्भपाताबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न