अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे २७ जून २०२५ रोजी(lifestyle)वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शेफाली जरीवाला बिग बॉस १३ आणि २००२ च्या ‘कांता लगा’ या प्रसिद्ध गाण्यासाठी ओळखली जात होती. दिवसेंदिवस महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशात महिलांनी जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजे याबाबत हृदयरोगतज्ज्ञांनी पुढील ६ गोष्टी सांगितल्या आहेत.

हृदयरोग हे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. २०१७ मध्ये पबमेड सेंट्रलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार , अमेरिकेत दर तीन महिलांपैकी एक महिला मृत्युमुखी पडते ?(lifestyle) शिवाय, भारतातील महिलांमध्ये हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
जागतिक स्तरावर आणि भारतातही महिलांच्या हृदयरोगाच्या समस्या वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल दिला आहे की दरवर्षी १.७३ कोटी मृत्यूंना कारणीभूत असलेले हृदयरोग हे जागतिक स्तरावर महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहेत,” असे जयपूर येथील सीके बिर्ला हॉस्पिटल/आरबीएचचे अतिरिक्त संचालक, इंटरव्हेंशन कार्डिओलॉजी डॉ. रुद्रदेव पांडे यांनी २०२३ मध्ये एचटी लाईफस्टाईलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पौष्टिक आहार घ्या
हृदयविकार टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. (lifestyle)तुम्ही आहारात फायबर, फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करु शकता. देशातील सध्याच्या संशोधन अंदाजानुसार, संतुलित आहारामुळे भारतीय महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी होते.
नियमित व्यायाम
व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. व्यायामामुळे रक्तप्रवाह वाढू शकतो, हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो आणि लोकांना वजन देखील नियंत्रणात ठेवता येते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम पातळीवर एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.
मद्यपान
मद्यपान केल्याने यकृताचे आजार उद्धवू शकतात. उच्च रक्तदाब आणि काही कर्करोगांचा धोका वाढणे यासारख्या अनेक आरोग्य समस्या वाढू शकतात. निरोगी आरोग्यासाठी अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.
जुनाट आजार
ज्या महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांना हृदयासंबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. या आजारांवर औषधे घेणे, आहारात बदल करणे आणि नियमित तपासणी कराणे यासारख्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
ताण कमी
जास्त ताणतणावामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगा करावा.
धूम्रपान सोडा
धूम्रपानामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. धूम्रपान सोडल्याने हृदयरोगाचा धोका कमी करता येतो आणि आरोग्य निरोगी ठेवता येते.
हेही वाचा :
सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!
राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा!
बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर