पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा(cricketers) मृत्यू झाला असून, या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड ने तीव्र दु:ख व्यक्त करत पाकिस्तानसोबत खेळायच्या आगामी त्रिकोणी टी20 मालिकेतून माघार घेतली आहे. हे खेळाडू एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यानंतर आपल्या गावाकडे परतत होते, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सत्तेपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी इस्लामाबाद आणि काबूल यांच्यातील 48 तासांच्या सीजफायरला मुदतवाढ देण्याची चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार झाले आहेत.

पाकिस्तानने हा हवाई हल्ला पक्तिका प्रांतातील उरगुन आणि बरमल जिल्ह्यांमध्ये केला. या भागातील रहिवासी वस्तींना लक्ष्य करण्यात आलं असून, मोठ्या प्रमाणात नागरी हानी झाल्याची माहिती आहे.ACB चं वक्तव्य – “हे खेळाडू आमचा अभिमान होते”अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड ने आपल्या तिन्ही खेळाडूंच्या (cricketers)निधनावर शोक व्यक्त केला. बोर्डाने एक्स वर पोस्ट करत म्हटलं, “पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील आमचे शूर क्रिकेटपटू आज संध्याकाळी पाकिस्तानी हवाई हल्ल्यात शहीद झाले. या भ्याड कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि संपूर्ण अफगाण क्रिकेट समुदाय या दु:खात एकत्र आहे.”

ACB ने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू पक्तिका प्रांताच्या राजधानी शाराना येथे झालेल्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी झाले होते. सामना संपल्यानंतर हे खेळाडू उरगुनमध्ये आपल्या घरी परतले आणि स्थानिक सभेत उपस्थित असताना त्यांच्यावर हवाई हल्ला करण्यात आला. या घटनेत कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तिन्ही क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उरगुन जिल्ह्यातील आणखी पाच नागरिक ठार झाले असून, सातजण जखमी झाले आहेत.ACB ने पुढे म्हटलं, “ही घटना अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी आणि क्रिकेट कुटुंबासाठी एक मोठी हानी आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या त्रिकोणी टी20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान सहभागी होणार होते.”टोलो न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व पक्तिका प्रांतात सलग अनेक हवाई हल्ले केले, ज्यामुळे नुकत्याच झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन झाले. हे घातक हल्ले दोन्ही देशांदरम्यान झालेल्या तीव्र सीमावादानंतर केवळ 48 तासांच्या शस्त्रसंधी दरम्यानच झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…
पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…
क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा