लुधियानाहून दिल्लीकडे जाणाऱ्या अमृतसर–सहरसा गरीब रथ एक्सप्रेस(express) (नंबर – 12204) ट्रेनला शनिवारी सकाळी सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. माहिती मिळाल्यानंतर ट्रेनने सरहिंद स्टेशन सोडल्यावर अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका कोचमधून धुर दिसल्याचे प्रवाशांनी पाहिले. तात्काळ ट्रेन थांबवली गेली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत कार्य सुरु केले. घटनास्थळी पोलीस आणि रेल्वेची टीम पोहोचली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या दुसर्‍या कोचमध्ये शिफ्ट करण्यात आले.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, एका महिला प्रवासी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ७.३० वाजता घडली. आग लागल्याचे कळताच तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी पावले उचलली, आग लागलेला डब्बा रिकामा केला आणि फायर टीमच्या मदतीने आग विझवण्यात आली. ही आग मर्यादित भागात राहिली, परंतु या आगीत तीन डब्बे जळून खाक झाले आहेत.

रेल्वेने अधिकृत स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की, “अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या(express) एका डब्ब्यात आग लागल्याचे लक्षात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रवाशांना दुसर्‍या कोचमध्ये शिफ्ट केले आणि आग विझवली. कुठल्याही प्रवाशाला इजा पोहोचलेली नाही. ट्रेन लवकरच आपल्या इच्छित स्थानकाकडे रवाना होईल.” सध्या आग लागण्याचे कारण तपासले जात आहे. रेल्वे आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत आणि ट्रॅक पुन्हा सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. थोड्यावेळात ट्रेन पुन्हा आपल्या मार्गावर रवाना होण्याची तयारी सुरु आहे.

हेही वाचा :

पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…
क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा
धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचे नग्न… तपासातून हादरवणारा खुलासा…