देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज राहणार नाही, आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक (pensioners)सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने केली जाणार आहे.

पीएफ खात्यात दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही टक्के रक्कम जमा केली जाते, तर त्याच प्रमाणात नियोक्त्याकडूनही निधी जमा होतो. या जमा रकमेवर कर्मचाऱ्यांना ८.५ टक्के व्याज मिळते आणि त्यावर चक्रवाढ व्याज लागू होते. त्यामुळे पीएफ हे केवळ बचत नसून एक दीर्घकालीन गुंतवणूक ठरते.

पूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे काढताना अनेक कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रिया पार करावी लागायची. अनेकांना या प्रक्रियेत विलंब आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ईपीएफओने ही प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस केली आहे.कर्मचारी आता कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय आपले पैसे थेट खात्यात मागवू शकतात. त्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत.

सध्याच्या नियमानुसार, एखादा कर्मचारी एक महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल, तर तो आपल्या पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतो. मात्र, नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी किमान २५ टक्के रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित राहील.पूर्वी नोकरी सोडून संपूर्ण रक्कम काढल्यास पेन्शन कालावधी कमी होत असे. पण आता नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांची सेवा निरंतर मानली जाईल, त्यामुळे पेन्शन(pensioners) लाभांवर कोणताही परिणाम होणार नाही.

हेही वाचा :

4 वी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
धनत्रयोदशीला करा ‘या’ वस्तूंची खरेदी, तुमच्या आयुष्यात होईल पैशांचा वर्षाव!
भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची…