उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मऊआइमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. २० वर्षीय तरुण झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचा प्रायव्हेट (private)पार्ट धारदार वस्तूने कापला, अशी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण रात्री आपल्या घरात गाढ झोपलेला होता. सकाळी जाग आल्यावर त्याला तीव्र वेदना होत होत्या. खोलीत कोणीही दिसले नाही. रक्ताच्या थारोळ्यात असलेला तरुण आपल्या भावाच्या खोलीत पोहोचला, पण तिथेच बेशुद्ध पडला.

घटनेची माहिती मिळताच मऊआइमा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला, मात्र आरोपी कोण होता याचा कोणताही सुगावा लागला नाही. परिसरातील लोक आणि कुटुंबीय या घटनेमुळे हादरले आहेत. पीडित तरुणाचे लग्न झालेले नव्हते आणि तो पाच भाऊ व दोन बहिणींपैकी(private) सर्वात लहान होता. तो घरात वेगळ्या खोलीत झोपत असे.पीडित तरुणाला तातडीने शहरातील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल केले गेले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेचे गूढ उलगडण्यासाठी शोध सुरू ठेवले आहेत आणि आरोपीला लवकरच पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!
हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू….
एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…