कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दीपावली!अर्थात दीपोत्सव! हा सण अफाट उत्साह घेऊन येतो.
गणेशोत्सव, नवरात्र आणि दीपावली हे तीन मोठे सण पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर किंवा संपता संपता येतात. या दिवसात पेरलेलं उगवलेलं असतं. पिकाची कापणी सुरू झालेली असते(Deepotsav). कृषी माल विकला गेलेला असतो. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे आलेले असतात. आनंदी आनंद असतो. म्हणूनच हे सर्व सण कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. दिन दिन दिवाळी! गाई म्हशी ओवाळी!असं आपण उगाच नाही म्हणत. यंदाच्या दीपोत्सवाला अंधाराची किनार आहे. कारण राज्यातील काही जिल्ह्यात पेरलेलं वाहून गेल आहे. मराठवाड्यात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. वाहून गेलेले शेत पुन्हा तयार करायच आहे. पडझड झालेली घरे पुन्हा उभी करायची आहेत. आणि हे काम आव्हानात्मक आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात आलेला हा अंधकार शासनाला आणि तुम्हा आम्हाला प्रयत्नपूर्वक दूर करावयाचा आहे. बळीराजांने
आलेल्या संकटामुळे हतबल होता कामा नये, त्यासाठी त्याला यंदाच्या दीपोत्सवातून ऊर्जा मिळाली पाहिजे. तशी ती मिळेल यासाठी प्रार्थना करूया. शुक्रवारच्या वसुबारस पासून यंदाच्या दीपोत्सवाला (Deepotsav)सुरुवात झाली आहे. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता शांतता आणि समृद्धी सर्वांना लाभो! धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्वंतरी सर्वांच्यावर प्रसन्न असू दे, निरामय आरोग्यदायी जीवन सर्वांना लाभू दे! नरक चतुर्थी म्हणजे असत्याशी प्रतिकार, लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीचा सहवास नित्य घडावा. नेहमी चांगल्या मार्गाने घरात लक्ष्मी यावी. बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडवा. यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात गोडवा यावा. असे या दीपावली उत्सवात सर्वांनीच गृहीत धरलेले असते आणि सर्वांच्या आयुष्यात मंगलमय घडावे अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या मनात सद्भावना असतात.
समाजातील विद्रोह, जातीय आणि आर्थिक विषमता, अज्ञान, असहिष्णता, वैर भावना, भ्रष्टाचार, दुराचार, सार्वजनिक अस्वच्छता,
अंधश्रद्धा अशा विविध मार्गाने समाजात आणि माणसाच्या आयुष्यात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी दीपावली सणाची योजना केलेली आहे. या निमित्ताने प्रत्येकाने शुभेच्छांची देवाण-घेवाण करावी. एकमेकाशी सुसंवाद साधावा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दीपावलीचा आनंद मिळावा. आणि खऱ्या अर्थाने बळीचे राज्य यावे अशी प्रत्येकाने प्रार्थना करावी. यासाठीच हा दीपोत्सव आहे आणि असतो. जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी आज अडचणीत आहे. अशा अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला सारा समाज धावून जाताना दिसतो आहे.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे. समाजाच्या आणि शासनाच्या सहकार्यातून शेतकरी त्याच्यावर आलेल्या संकटाचा अंधार बाजूला सारेल, आलेल्या संकटाला समर्थपणे सामोरे जाईल, तो पुन्हा उभा राहील, पुन्हा शेतात जाईल, कारण त्याला लोकांना जगवायचे आहे, लोकांसाठी अन्नदाता व्हायचे आहे. लोकांचा पोशिंदा बनायचे आहे, या आव्हानात्मक कामासाठी परमेश्वराने त्याला अखंड ऊर्जा द्यावी, त्याच्या मागे उभे राहावे अशी प्रार्थना करूया!

शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर पासून सुरू झालेला दीपोत्सव सहा दिवस चालणार आहे. बाजारपेठा सजलेल्या आहेत. ग्राहकांची गर्दी आहे. करोडो रुपयांची उलाढाल होत आहे आणि होणार आहे. नेहमीच्या ताणतणावातून थोडेसे दूर होण्यासाठी अशा सणांची अशा उत्सवांची समाजाला गरज असते. या सहा दिवसात(Deepotsav) मिळणारी ऊर्जा घेऊन समाज पुन्हा उभा राहत असतो. विशेष म्हणजे हा दीपोत्सव हिंदू धर्मियांचा असला तरी अन्य धर्मीय लोक सुद्धा या उत्सवात सहभागी होत असतात. हिंदू धर्मियांना शुभेच्छा देत असतात. एकूणच समाजाला, राज्याला, देशाला एकत्र ठेवण्याची ताकद सणांमध्ये असते, उत्सवामध्ये असते.
हेही वाचा :
एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…
पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…
क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा