राज्यातील शेतकऱ्यांना कृषी(Agriculture) विभागाशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधणे अत्यंत सुलभ होणार असून, शासकीय योजनांची माहिती मिळवताना होणारी धावपळ थांबणार आहे.कृषी विभागाने ‘महावितरण’च्या धर्तीवर एक नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, राज्यातील सर्व कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विभागाकडून एक अधिकृत सिम कार्ड दिले जाईल. हा संपर्क क्रमांक त्या अधिकाऱ्यासाठी किंवा पदासाठी कायमस्वरूपी निश्चित असेल.

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली किंवा तो निवृत्त झाला, तरीही तो संपर्क क्रमांक बदलणार नाही. नवीन येणारा अधिकारी तोच क्रमांक वापरेल. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी नवीन अधिकाऱ्याचा नंबर शोधण्यासाठी करावी लागणारी धावपळ वाचणार आहे.अनेकदा अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक बदलल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क तुटतो. यामुळे शेतकरी विविध शासकीय योजनांच्या माहितीपासून आणि मार्गदर्शनापासून वंचित राहतात, परिणामी त्यांना वेळेवर लाभांपासून मुकावे लागते.

कृषी(Agriculture) विभागाच्या या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या या मुख्य अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. एकाच अधिकृत क्रमांकामुळे शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांशी होणारा संवाद सातत्यपूर्ण राहील आणि माहिती मिळवण्यात कोणताही विलंब होणार नाही.

हेही वाचा :

तेल की तूप कोणते दिवे दारात लावणं लाभदायक, जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट…
क्रिकेटमध्ये आता असा शॉट खेळण्यास मनाई, नियमाचा गोलंदाजांना होणार थेट फायदा
सर्वात मोठी रेड; नोटा मोजता मोजता अधिकाऱ्यांना फुटला घाम