क्रिकेटमध्ये (cricket)खेळाच्या सुरुवातीपासूनच नियमांमध्ये बदल होत आले आहेत आणि आता आयसीसीने फलंदाजांच्या सुरक्षे आणि खेळाच्या नीटनेटकेपणासाठी नवीन नियम जाहीर केला आहे. आयसीसीच्या या नव्या नियमानुसार, फलंदाजाला स्टंपच्या मागे जाऊन फटकेबाजी करता येणार नाही. जर एखादा फलंदाज स्टंपच्या मागे जाऊन शॉट मारतो, तर तो शॉट डेड बॉल घोषित केला जाईल आणि त्यातून कोणत्याही धावा मिळणार नाहीत. या स्थितीत गोलंदाजाला निर्धारित चेंडू मिळेल आणि फलंदाज त्रिफळाचीत झाल्यास तो आऊट ठरवला जाईल.

हा नियम टी20, वनडे आणि कसोटी क्रिकेटसाठी(cricket) लागू केला जाईल. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी या नियमाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, या नियमामुळे फलंदाजांना खेळताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार आहे, विशेषतः टी20 क्रिकेटमध्ये जेथे स्टंपच्या मागे जाऊन शॉट्स खेळले जातात.
या नियमाच्या आधी वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड अनेकदा स्टंपच्या मागे जाऊन शॉट्स मारताना दिसले आहेत, ज्यामुळे गोलंदाजांना संभ्रमात टाकून क्षेत्ररक्षण बिघडवले जात असे. आता असे शॉट्स डेड बॉल ठरतील, चौकार किंवा षटकारांसह त्या धावा गणल्या जाणार नाहीत. त्यामुळे फलंदाजांना आता प्रत्येक फटका मारण्यापूर्वी नियमांचा विचार करून शॉट खेळावा लागणार आहे.
हेही वाचा :
रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी…
‘…तर स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील’; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट
मी तिला माझी मुलगी म्हणायचो… पण जेव्हा तिच्यासोबतच किसिंगसीन होता, तेव्हा