क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा सामना आता अतिशय परवडणाऱ्या दरात पाहता येणार आहे. स्टेडियममध्ये सामना(match) पाहण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या चाहत्यांना केवळ 60 रुपयांत टीम इंडियाचा सामना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. तिकीट विक्रीची सुरुवात दिवाळीपासून करण्यात येणार असून, बंगाल क्रिकेट असोसिएशनने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या सामन्याचे तिकीट दर केवळ 60 रुपयांपासून सुरू होतील.

चाहते हे तिकीट डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो अॅपद्वारे ऑनलाईन खरेदी करू शकतात. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या मते, एका दिवसाच्या सामन्यासाठी(match) किमान तिकीट दर 60 रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतल्याने स्थानिक चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होणार आहे. या दोन कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामन्यांच्या मालिकेचा रोमांचक थरार रंगणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांकडून कडवी स्पर्धा अपेक्षित आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 चं विजेतेपद पटकावलं होतं. तर टीम इंडियाने अलीकडेच विंडीजला 2-0 ने हरवून घरच्या मैदानावर दमदार कामगिरी केली होती. येणाऱ्या मालिकेत चाहत्यांना पुन्हा एकदा रोमांचक क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. 30 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात आणि 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेचा थरार रंगणार आहे.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगाची तयारी जोरात सुरू….
यांचं जगच वेगळं… या लोकांना न्यूड राहण्याची वाटत नाही लाज
या अभिनेत्रीवर का लागला अँटी हिंदू असण्याचा आरोप…