जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये फिनलंडने सलग आठव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. या देशातील नागरिकांचा लाईफ सॅटीस्फॅक्शन स्कोअर 7.741 असून तो इतर देशांच्या तुलनेत अत्यंत उंच आहे. मात्र फिनलंडमधील आनंद केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या अनोख्या(different) संस्कृतीत आणि जीवनशैलीतही दिसून येतो.

येथे सौना संस्कृती ही फक्त आंघोळीपुरती मर्यादित नसून सामाजिक बाँडिंगचेही केंद्र आहे. न्यूडिटी ही बेशरमपणा मानली जात नाही, तर विश्वासाचे प्रतीक मानली जाते; व्यवसायिक बैठकाही सौनामध्ये पार पडतात आणि “जे सौनामध्ये घडते ते सौनामध्येच राहते” हा नियम लागू असतो. विद्यार्थ्यांना कमी वर्गसत्रे, मर्यादित होमवर्क, आणि खेळावर आधारित शिक्षण दिले जाते, तर शिक्षकांकडे मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे.

कामाचे तास ८ ते ४ वाजेपर्यंत असून, वर्षभरात ५ आठवडे सुट्टी मिळते. या सोप्या जीवनशैली, पर्यावरणीय आणि सामाजिक संतुलनामुळे फिनलंडमधील लोकांचा आनंद पैशांपेक्षा (different)त्यांच्या दैनंदिन सोप्या निवडींवर अधिक अवलंबून आहे, आणि त्यामुळे हा देश सतत जागतिक आनंद अहवालात आघाडीवर राहतो.

हेही वाचा :

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक
प्रसिद्ध गायकाची चौथी बायको लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची होती गरोदर…
सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…