WhatsApp चा मालक असलेली कंपनी मेटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp युजर्सवर(users) होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, आता युजर्स थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर करू शकणार नाहीत. मेटाने हा नवीन निर्णय घेत सांगितलं आहे की, आता मेजेसिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे युजर्स WhatsApp वर केवळ मेटा AI असिस्टेंटचाच वापर करू शकणार आहेत. याशिवाय युजर्ससाठी इतर सर्व थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर बॅन केला जाणार आहे.

कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा ओपनएआई आणि परप्लेक्स्टिी सारख्या कंपन्यांना मोठा झटका लागणार आहे. या कंपन्या AI च्या शर्यतीत मेटाला टक्कर देत आहेत. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स (users)आता WhatsApp वर केवळ मेटा AI चा वापर करू शकणार आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp चा अशा युजर्सवर मोठ्या प्रमाणात होणार आहे, जे चॅटजीपीटीचा वापर करत असतात.

मेटाचा हा नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू केला जाणार आहे. म्हणजेच 15 जानेवारीनंतर WhatsApp वर ChatGPT आणि परप्लेक्सिटी AI सारखे चॅटबोट्स ऑपरेट केले जाणार नाहीत. यासाठी मेटाने WhatsApp Business API अपडेट केले आहे. कंपनीच्या अपडेटेड पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर एखादी कंपनी चॅटबॉट ही मुख्य सेवा देत असेल, तर ती कंपनी WhatsApp बिझनेस सोल्युशन वापरू शकत नाही.

मेटाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, या निर्णयामुळे ट्रॅवल कंपन्या आणि ई-कॉम ब्रँड्ससह अशा व्यवसायांवर कोणताही परिणाम होणार नाही, जे ऑटोमेटेड कस्टम सर्विस बॉट्स आणि दूसरे लिमिटेड पद्धतींचा वापर करत आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम अशा AI स्टार्टअप्सवर होणार आहे, जे WhatsApp द्वारे ग्राहकांना चॅट-आधारित सहाय्यक प्रदान करणे. मेटाने सांगितलं आहे की, या ट्रेंडमुळे त्याच्या पायाभूत सुविधा आणि सपोर्ट सिस्टमवर दबाव येत आहे. मेटाचे म्हणणे आहे की WhatsApp बिझनेस एपीआय हे व्यवसाय आणि ग्राहकांमधील संवाद सुलभ करण्यासाठी डिझाइन केले गेले होते, मोठे एआय मॉडेल्स होस्ट करण्यासाठी नाही.

स्पॅम रोखण्यासाठी आता WhatsApp आता एक नवीन निर्णय घेणार आहे. याअंतर्गत, उत्तर न देणाऱ्या लोकांना पाठवलेल्या मेसेजवर मंथली लिमिट लागू केली जाऊ शकते. हा निर्णय व्यवसायांना तसेच यूजर्सना लागू होईल. पुढील काही आठवड्यात अनेक देशांमध्ये चाचण्या सुरू होतील. कंपनी सतत त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करत आहेत. हे बदल युजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहेत. मात्र याचा वाईट परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध गायकाची चौथी बायको लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची होती गरोदर…
सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…
1566.40 कोटी रुपये महाराष्ट्राला Advance मध्ये मिळणार; पण कशासाठी? अमित शाह कनेक्शन चर्चेत