बॉलिवूडच्या इतिहासात जर एखादा गायक असा असेल ज्याने आपल्या आवाजाने, विनोदाने आणि व्यक्तिमत्त्वाने अमिट ठसा उमटवला, तर तो म्हणजे किशोर कुमार. त्यांची गाणी आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मात्र फारच थोड्यांना माहिती आहे. कारण किशोर कुमार यांचं वैयक्तिक आयुष्य सिनेमापेक्षाही अधिक नाट्यमय होतं.किशोर कुमार यांनी आयुष्यात एक-दोन नाही, तर चार लग्नं केली होती. मात्र, त्यांच्या चौथ्या लग्नाची कहाणी अतिशय वेगळी आणि चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यांच्या चौथ्या पत्नी लीना चंदावरकर लग्नाच्या वेळी नऊ महिन्यांच्या गर्भवती(pregnant) होत्या!

लीना चंदावरकर यांचं पहिलं लग्न गोव्यातील मुख्यमंत्री दयानंद बंडोडकर यांचे पुत्र सिद्धार्थ बंडोडकर यांच्यासोबत झालं होतं. पण हे लग्न फक्त ११ दिवसांचं ठरलं. बंदूक साफ करताना झालेल्या अपघातात सिद्धार्थ यांना गोळी लागली आणि त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर लीना पूर्णपणे खचल्या होत्या.बराच काळ सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. त्याच काळात ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट किशोर कुमार यांच्याशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलली.

किशोर कुमार यांनी लीनाला लग्नाची मागणी घातली, पण लीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला ती मागणी नाकारली. कारण किशोर कुमार यांची आधीच तीन लग्नं झालेली होती. लीनाचे वडील या विवाहाच्या विरोधात होते. मात्र, किशोर कुमार यांच्या आग्रहामुळे आणि समजुतीने अखेर हे लग्न पार पडलं.एका जुन्या मुलाखतीत लीना चंदावरकर यांनी सांगितलं होतं —“जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा मी नऊ महिन्यांची गर्भवती(pregnant) होते. मला खूप त्रास होत होता… मी थांबून थांबून सप्तपदी घेत होते.”किशोर कुमार यांच्या स्वभावाबद्दल लीना पुढे म्हणाल्या,

“ते खूप वेगळे होते. त्यांचे मूड्स अचानक बदलायचे. कधी गंभीर, तर कधी बालिश. कधी असे चेहरे करायचे की मला भीती वाटायची, पण त्याच क्षणी ते मला खूप हसवायचेही.”किशोर कुमार आणि लीना यांच्या संसारातून त्यांचा मुलगा सुमित कुमार याचा जन्म झाला. आज तो देखील संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
हेही वाचा :
सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…
1566.40 कोटी रुपये महाराष्ट्राला Advance मध्ये मिळणार; पण कशासाठी? अमित शाह कनेक्शन चर्चेत
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये मंजूर