दिवाळीचा आनंद दुप्पट करण्यासाठी घरबसल्या कुटुंबासोबत बॉलिवूडच्या भन्नाट फॅमिली ड्रामा चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. हे चित्रपट(movies) पाहताना तुम्हाला क्षणभरही कंटाळा येणार नाही. उलट या चित्रपटांमुळे तुमची दिवाळी आणखी खास आणि अविस्मरणीय बनेल.या लिस्टमध्ये रणवीर सिंगपासून ते अजय देवगणपर्यंतच्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट तुम्ही थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर बसून बिंज वॉच करू शकता.

रॉकी और रानी की प्रेम कहानी
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही फिल्म कुटुंबासोबत बघण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. यात फॅमिली ड्रामा आणि कॉमेडी यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. रणवीर-आलिया याशिवाय धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चनसारख्या दिग्गज कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तुम्ही ही चित्रपट प्राइम व्हिडिओवर बिंज वॉच करू शकता.
गुडबाय
रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही चित्रपटही कुटुंबासोबत बघण्यासाठी एकदम योग्य आहे. प्रत्येक टप्प्यावर कॉमेडीचा तडका तिथे तुम्हाला नक्कीच मजा येईल. या चित्रपटात (movies)रश्मिका आणि अमिताभ बच्चन व्यतिरिक्त नीना गुप्ता, पावेल गुलाटी, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
भूलचूक माफ
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला आहे. यात तुम्हाला फॅमिली ड्रामा पाहायला मिळेल. करण शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही फिल्म तुम्ही प्राइम व्हिडिओवर कुटुंबासोबत बसून बिंज वॉच करू शकता.
सन ऑफ सरदार २
अजय देवगन आणि मृणाल ठाकुर यांची ही कॉमेडी फिल्म अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटात तुम्हाला जोरदार कॉमेडीसोबत कुटुंबातील घट्ट नातेही पाहायला मिळतील. कुटुंबासोबत घरबसल्या पाहण्यासाठी ही फिल्म एकदम परफेक्ट पर्याय आहे.
दिल धड़कने दो
रणवीर सिंग आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेली (movies)ही मल्टी-स्टार फिल्म कुटुंबावर आधारित आहे. यात फॅमिली ड्रामाचा सुंदर अनुभव मिळतो जो तुमच्या नात्यांना अधिक घट्ट करेल. जोया अख्तर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही फिल्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
हेही वाचा :
WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक
प्रसिद्ध गायकाची चौथी बायको लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची होती गरोदर…
सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…