परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूरसह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या (farmers)शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतंच 2,215 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. आता केंद्र सरकारकडून आणखी मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी) अंतर्गत महाराष्ट्रासाठी 1,566.40 कोटी रुपये आगाऊ मंजूर केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण निधी) च्या केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे. यात महाराष्ट्राला 1,566.40 कोटी रुपये, तर कर्नाटकला 384.40 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एकूण 1,950.80 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना मंजूर केली आहे.

या मदतीमुळे महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना(farmers) दिलासा मिळणार आहे. मान्सून आणि परतीच्या पावसाने या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला होता. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी म्हटलं आहे —

“मान्सूनच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मदत म्हणून केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1,566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदतीची प्रक्रिया सुरू आहे.”

केंद्र सरकारने यंदा आपत्ती निवारणासाठी देशभरातील राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. आतापर्यंत एसडीआरएफ अंतर्गत 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये, आणि एनडीआरएफ अंतर्गत 15 राज्यांना 2,189.28 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधी मधून 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी मधून 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आणखी 1,566.40 कोटी रुपये मंजूर केले असून, ही मदत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. राज्यातील शेतकरी याकडे आशेने पाहत आहेत.

हेही वाचा :

पावसाचे सावट गडद; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा..
‘कांतारा चॅप्टर १’ चे निर्माते झाले मालामाल,
राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका;