नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सांगितले आहे की, ज्या दिवशी धनादेश(check) बँकेत भरला, त्याच दिवशी सुरू झालेली नवीन इमेज-आधारित क्लीअरन्स प्रणाली आता स्थिर झाली आहे. नव्या प्रणालीतील बहुतेक बँकांच्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून, केंद्रीय प्रणाली सोमवारपासून सुरळीत कार्यरत आहे. काही किरकोळ अडचणी सोडवण्यासाठी एनपीसीआय बँकांसोबत काम करत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार, ही प्रणाली पूर्वीच्या बॅच प्रोसेसिंग (टी1) पद्धतीऐवजी सतत क्लीअरन्स प्रणाली (टी0) वर आधारित आहे आणि ही पद्धत ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाली आहे. सुरुवातीला अनेक सरकारी आणि खाजगी (check)बँकांना सॉफ्टवेअर व प्रशिक्षणाच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते, ज्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात रकमेच्या जमा होण्यात विलंबाचा सामना करावा लागला.
एनपीसीआयने स्पष्ट केले की, “प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यात विलंब झाला; मात्र, बहुतेक समस्या आता सुटल्या आहेत.” त्यामुळे ग्राहक आता या नव्या क्लीअरन्स प्रणालीचा सुरळीत लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा :
100 लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली; कारण जाणून धक्का बसेल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय
तेल की तूप कोणते दिवे दारात लावणं लाभदायक, जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट…