आज 18 ऑक्टोबर म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांची जयंती. 18 ऑक्टोबर १९५० रोजी जन्मलेले आणि 2017 मध्ये जगाचा निरोप घेतलेले हे बहुआयामी अभिनेते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या अभिनयाने सजलेल्या अनेक चित्रपटांनी भारतीय सिनेमाला नवे(scene) आयाम दिले.

ओम पुरी यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ज्यामध्ये गंभीर, सामाजिक, विनोदी आणि भावनिक अशा सर्वच प्रकारात ते समान ताकदीने दिसले. पण त्यांच्या काही चित्रपटांबद्दल आजही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसते. त्यापैकी एक म्हणजे ‘आस्था: इन द प्रिझन ऑफ स्प्रिंग’ हा 1997 साली प्रदर्शित झालेला चित्रपट.या चित्रपटात ओम पुरी यांनी अभिनेत्री रेखा यांच्या पतीची भूमिका (scene)साकारली होती. दिग्दर्शिका बसु भट्टाचार्य यांच्या या चित्रपटात समाजातील नातेसंबंध, नैतिकता आणि स्त्रीच्या आयुष्यावरील सामाजिक बंधनं या विषयांना स्पर्श करण्यात आला होता.

‘आस्था’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवू शकला नाही पण त्यातील रेखा आणि ओम पुरी यांच्या अभिनयाची विशेषतः त्यांच्या काही इंटीमेट सीनची मात्र, त्या काळात मोठी चर्चा रंगली होती. 1990 च्या दशकात अशा प्रकारचे सीन क्वचितच पाहायला मिळत असल्याने, या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.चित्रपटातील एका प्रसिद्ध सीनमध्ये दोघे पती-पत्नी कुर्सीवर बसलेले असतात आणि त्या क्षणात दाखवलेली वास्तवता व भावनिक तीव्रता यामुळे तो सीन आजही आठवला जातो. काही वृत्तांनुसार, या ,सीनच्या(scene) शूटिंगवेळी ओम पुरी आणि रेखा आपल्या भूमिकेत इतके गुंतले होते की त्या क्षणी संपूर्ण सेटवर शांतता पसरली होती.

ओम पुरी यांनी सदैव आपल्या अभिनयाने पात्रांना वास्तवाचा गंध दिला. रेखासारख्या अनुभवी अभिनेत्रीसमवेत त्यांनी केलेला ‘आस्था’ हा चित्रपट आजही त्यांच्या प्रगल्भ अभिनयशैलीचे उदाहरण म्हणून घेतला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची पुन्हा एकदा उजळणी केली आहे.

हेही वाचा :

‘…तर स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील’; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट
मी तिला माझी मुलगी म्हणायचो… पण जेव्हा तिच्यासोबतच किसिंगसीन होता, तेव्हा
घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले