राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. गुवाहाटी येथे १० लाखांची लाच स्वीकारताना या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर झालेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींची रोकड (raid)आणि मालमत्ता उघडकीस आली, ज्यामुळे तपास यंत्रणाही चकित झाल्या आहेत.सीबीआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा सापळा रचण्यात आला. एनएचआयडीसीएलच्या गुवाहाटी येथील प्रादेशिक कार्यालयाचा कार्यकारी संचालक, मैसनाम रितेन कुमार सिंह , याला १४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. एका खासगी कंपनीला त्यांच्या चालू कामात मदत करण्याच्या बदल्यात तो १० लाख रुपयांची लाच स्वीकारत होता.

ही लाच आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-३७ वरील एका प्रकल्पासाठी मागण्यात आली होती. प्रकल्पाची मुदत वाढवून देणे आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ही रक्कम स्वीकारताना सीबीआयने सिंह याला रंगेहाथ पकडले. या कारवाईसोबतच, या प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक बिनोद जैन यांच्या कार्यालयांची आणि घरांचीही झडती घेण्यात आली(raid).अटकेनंतर सीबीआयने गुवाहाटी , गाझियाबाद आणि इम्फाळ येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला ऐवज पाहून तेही चक्रावले. घरातून तब्बल २.६२ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ट्रंका भरून पैसे जप्त करण्यात आले. ही रक्कम इतकी मोठी होती की नोटा मोजण्यासाठी आणलेली मशीन गरम झाली आणि अधिकाऱ्यांचे हात थकून घाम सुटला, तरी नोटा संपत नव्हत्या. याशिवाय चांदीच्या विटा आणि दोन महागडी घड्याळेही जप्त करण्यात आली.

रोख रकमेव्यतिरिक्त, सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रेही सापडली. यामध्ये दिल्ली-एनसीआर मधील ९ लक्झरी फ्लॅट, १ ऑफिस आणि ३ प्लॉट; बंगळूरू मधील १ फ्लॅट व १ प्लॉट; गुवाहाटी मधील ४ फ्लॅट व २ प्लॉट; आणि इम्फाळ पश्चिम येथील २ भूखंड व शेतजमिनीच्या(raid) कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच, ६ आलिशान वाहनांमधील गुंतवणुकीची कागदपत्रेही सीबीआयने जप्त केली आहेत. तपास यंत्रणांना या मालमत्तेचे बाजारमूल्य कागदोपत्री मूल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचा संशय आहे.

हेही वाचा :

रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी…
‘…तर स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील’; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट
मी तिला माझी मुलगी म्हणायचो… पण जेव्हा तिच्यासोबतच किसिंगसीन होता, तेव्हा