अकोल्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अकोल्याच्या तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका विधवा महिलेला रात्री (Night)भेटल्यास पगाराचे काम करून देतो, असं महसूल सहाय्यक यांनी म्हंटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने अकोल्यात संताप व्यक्त होत आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला तहसील कार्यालयात गेल्यानंतर महसूल सहाय्यक खुळे यांनी तिचा हात पकडला आणि रात्री(Night) भेटल्यास पगाराचे काम करून देतो असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचवेळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर देखील “तू मला भेट” असे सांगून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेने पोलिसांकडे केला आहे.

महिलेने दिलेल्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ भारतीय दंड संहितेच्या संबंधित ७४ कलमान्वये महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणांनंतर आता तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची पुढील काय कारवाई कारण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, संबंधित महसूल सहाय्यकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

हेही वाचा :

मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!
हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू….
एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…