2025 मध्ये तीन चित्रपटांनी(films) बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडून काढले. विशेष म्हणजे हे तीनही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारांतील होते. ‘छावा’ हा एक ऐतिहासिक चित्रपट, ‘सैयारा’ ही एक प्रेमकथा होती आणि ‘महावतार नरसिंह’ हा एक अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट होता. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि आता हे सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम होत आहेत.

विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता आणि नंतर त्याचा तेलगू डबही रिलीज करण्यात आला. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ‘ या चित्रपटाने सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार भारतात 601.54 कोटींची नेट कमाई केली, तर जगभरात 807.91 कोटींचा गल्ला जमवला. ही 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 45 दिवसांनी, म्हणजे 11 एप्रिल 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला असून तो आता तुम्ही नेटफ्लिक्सवर बिंज वॉच करू शकता.
मोहित सूरी दिग्दर्शित आणि नवोदित कलाकार अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सैयारा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचं मन जिंकलं नाही, तर मोठी कमाईही केली. सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार या सरप्राइज ब्लॉकबस्टरने भारतात 329.2 कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर वर्ल्डवाइड 569.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘सैयारा’ 12 सप्टेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, हा हृदयस्पर्शी आणि रोमँटिक चित्रपट तुम्ही वीकेंडला बिंज वॉच करण्यासाठी नक्कीच निवडू शकता.

अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’(films) हाही एक सरप्राइज ब्लॉकबस्टर ठरलेला अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट आहे. 25 जुलै 2025 रोजी हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आणि काहीच वेळात त्याने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतात 250.29 कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर वर्ल्डवाइड कमाई 325.74 कोटी रुपये इतकी झाली. ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. हा पौराणिक आणि व्हिज्युअली शानदार चित्रपट तुम्ही या फेस्टिव्ह वीकेंडला नेटफ्लिक्सवर बिंज वॉचसाठी नक्कीच पाहू शकता.
हेही वाचा :
अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्…Video Viral
भारतीय घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात गोदरेज अप्लायंसेन्स आघाडीवर, भारतीय ब्रँडचा नवा अभिमान!
केंद्र सरकारने रुग्णालयांसाठी लागू केली नवीन दररचना….