टीम इंडियाच्या निवडीदरम्यान पाच मोठे निर्णय! हार्दिक पांड्याचं काय?

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर लगेच टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मालिका होणार आहे. ही मालिका 6 जूनपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. पण हार्दिक पांड्याचं काय याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होईल त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ आयपीएल स्पर्धेनंतर पहिली आंतरराष्ट्रीय मालिका अफगाणिस्तानविरूद्ध खेळणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात येणार असून एक कसोटी आणि तीन वनडे खेळणार आहे. ही दौरा 6 जूनपासून सुरू होईल.(Hardik Pandya) यासाठी टीम इंडियाच्या निवडीची घोषणा गुवाहाटीत होणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी निवड केली जाणार आहे. रिपोर्टनुसार, निवड समिती वनडे संघातून हार्दिक पांड्याला, तर कसोटी संघातून जसप्रीत बुमराहला वगण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त निवड समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय निवड समितीने हार्दिक पांड्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर ठेवण्याच निर्णय घेतला आहे. फिटनेसमुळे असा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या पाठदुखीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्ध काही सामन्यांमध्ये खेळला नाही. सध्या त्याचावर उपचार सुरू असून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. (Hardik Pandya) त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड होणं कठीण दिसत आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला आराम देऊन मोहम्मद शमीला कसोटीत संधी देण्याची शक्यता आहे. निवड समितीचा हा दुसरा मोठा निर्णय ठरू शकतो.भारतीय निवड समिती देवदत्त पडिक्कलला कसोटी संघात संधी देऊ शकते. साई सुदर्शनची कसोटीतील कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे देवदत्त पडिक्कलचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. कारण देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या धावा केल्या आहेत.

ऋषभ पंतची बॅट काही चालत नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतही फेल गेला. त्यामुळे त्याला वनडे संघातून बाहेर केलं जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, विकेटकीपर केएल राहुलला विकेटकीपर फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. तर दुसरा विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशनचा विचार केला जाईल. कारण हे खेळाडू फॉर्मात आहेत. भारतीय निवड समितीचं वेगवान गोलंदाज प्रिंस यादवच्या कामगिरीकडे लक्ष आहे. (Hardik Pandya) त्यामुळे त्याला संधी देण्याचा विचार केला जात आहे. प्रिंस यादवने आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या वेगाने आणि व्हेरिएशनने प्रभावित केलं आहे.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!