क्रिकेटर (Cricketer)हार्दिक पांड्या सध्या पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. या वेळी तो फॅशन मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपलं रिलेशनशिप ऑफिशियल केलं असून सध्या हे दोघे मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करत आहेत. त्याचदरम्यान माहिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की ती लवकरच एक ‘गुड न्यूज’ देणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की माहिका आणि हार्दिक लग्न करणार आहेत का, की या हिंटमागे काही वेगळं कारण आहे.

हार्दिक पांड्या क्रिकेट मैदानावर जितका प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक तो आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहतो. त्याचे नाव अनेकदा विविध अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले आहे. त्याची आणि एक्स वाइफ नताशा स्टॅनकोव्हिकची काही महिन्यांपूर्वीच वेगळी वाट झाली. आता हार्दिक आपल्या आयुष्यात पुढे सरकला आहे आणि सध्या तो मॉडेल माहिका शर्मासोबत नवीन रिलेशनशिपमध्ये आहे.
दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर केले आहेत आणि त्यावरून त्यांच्या रिलेशनशिपला आता अधिकृत मानलं जातं आहे. मालदीवमधून माहिका आणि हार्दिकचे रोमँटिक फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. दरम्यान माहिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक हिंट दिला आहे, ज्यामुळे चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. माहिकाच्या एका मैत्रिणीने पोस्ट केली होती की, “या सीझनच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये तूला खूप मिस केलं , पण तुझ्या या अनाउन्समेंटसाठी मी थांबले होते.” ही स्टोरी माहिकाने री-शेअर करत लिहिलं, “उफ्फ, किती गोड आहे हे! लवकरच सर्वांना भेटेन आणि हो, हा वाट पाहण्याचा काळ व्यर्थ जाणार नाही.”

या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे की माहिका आणि हार्दिक (Cricketer)आता लग्नाच्या तयारीत आहेत का, की हे काहीतरी वेगळंच अनाउन्समेंट आहे. हार्दिक आणि माहिकाचे नातं जाहीर झाल्यापासून दोघंही चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांना अनेकदा डिनर डेट्सवर आणि एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे. सध्या ते दोघं मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. दोघांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एकत्र फोटो शेअर केले आहेत, ज्यात ते हातात हात घेऊन दिसत आहेत.माहिका शर्मा ही एक प्रसिद्ध फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे, जी फॅशन आणि लाईफस्टाईलशी संबंधित कंटेंट तयार करते.
माहिकाच्या आधी हार्दिकचं नाव अनेक हसीनांसोबत जोडले गेलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचं नाव सिंगर जैस्मिन वालियासोबत चर्चेत आलं होतं, मात्र ती केवळ अफवा ठरली. हार्दिकने 2018 मध्ये नताशा स्टॅनकोव्हिकला डेट करण्यास सुरुवात केली, 2019 मध्ये तिला प्रपोज केलं आणि 2020 मध्ये लग्न केलं. पण 2024 मध्ये दोघं विभक्त झाले.आता असं दिसतं आहे की हार्दिकच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम फुललं आहे आणि माहिका शर्मा त्याच्या नव्या प्रवासाची नायिका ठरली आहे.
हेही वाचा :
साजशृंगार केला, फुगे घेतले अन् क्रेनला लटकून कपलने केलं अनोखं शूट; Video Viral
महिनाभर टिकून राहणार ‘मक्याचा चिवडा’
‘दिसला गं बाई दिसला २.०’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस