वेस्टइंडीजचा धडाकेबाज ऑलराउंडर ड्वेन ब्रावो(cricketer) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या क्रिकेटमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे. रिपोर्ट्सनुसार, ब्रावो अजूनही अविवाहित आहे पण त्याला तीन मुले आहेत आणि त्याचं नाव तीन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सशी जोडले गेलं आहे. ब्रावोच्या ग्लॅमरस पार्टनर्सपैकी सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे खिता गोंझालविस, जी एक प्रोफेशनल शेफ आहे. ती ब्रावोच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि अनेकदा ती त्याला स्टेडियममध्ये चीअर करताना दिसते.

खिता ही केवळ ब्रावोची पार्टनर नसून स्वतःच्या करिअरमध्येही यशस्वी आहे. तिने फ्रान्स, इटली आणि अमेरिकेतून शेफ म्हणून ट्रेनिंग घेतली असून सध्या ती त्रिनिदादमध्ये राहते. ब्रावो आणि तिचा एक मुलगा आहे आणि दोघे मिळून कौटुंबिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. खिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असून तिची स्टाईल, फॅशन आणि ग्लॅमरस लूकमुळे ती कॅरिबियन सेलिब्रिटींमध्ये गणली जाते.

ब्रावोच्या आयुष्यातील रिलेशनशिप्स नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. त्याचं नाव बार्बाडोसच्या मॉडेल रेजिना रामजित आणि इतर काही मॉडेल्सशीही (cricketer)जोडले गेले होते. मात्र, सर्वात स्थिर नातं त्याचं खिता गोंझालविससोबतचं आहे. ब्रावोच्या तिन्ही मुलांची आई वेगवेगळ्या रिलेशनमधील आहेत. पण तरीही ब्रावो आपल्या सर्व मुलांशी जवळीक ठेवतो आणि एक जबाबदार वडील म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा :
तो पर्यंत निवडणुकाच घेऊ नका, राज ठाकरेंची मोठी मागणी…
Samsung Galaxy M17 5G च्या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स…
‘तिचे एकाच वेळी दोघांसोबत संबंध…’; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा