बीएसएनएलने दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफर सुरू केली आहे. (speed)या खास दिवाळी ऑफरमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे लक्ष वेधले गेले असून, लाखो मोबाईल यूजर्सना कमी किमतीत फायदे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.बीएसएनएलने दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफरअंतर्गत ग्राहकांना फक्त १ रुपयात ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय, कंपनी लाखो वापरकर्त्यांसाठी १ महिन्याची वैधता असलेली योजना देखील देणार आहे.

बीएसएनएल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. (speed)अलीकडे कंपनीने 4G सेवा सुरू केली असून, आता दिवाळी बोनान्झा ऑफर लाँच करून यूजर्सना विशेष फायदे देण्याचा निर्णय घेतला आहे.बीएसएनएलच्या माहितीनुसार, दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि फक्त १५ नोव्हेंबरपर्यंतच ग्राहकांना लाभ मिळेल. हा प्लॅन कमी किमतीत अनेक फायदे देतो.

बीएसएनएलने दिवाळी ऑफर अंतर्गत नवीन ग्राहकांसाठी फक्त १ रुपयात ४जी सिम उपलब्ध करून दिला आहे. फक्त १ रुपयात सिम घेऊन तुम्ही ३० दिवसांसाठी सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे महागाईच्या काळात मोठा फायदा मिळतो.(speed)बीएसएनएलच्या दिवाळी ऑफरमध्ये १ रुपयांच्या ४जी सिमसह ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट डेटा देखील मिळेल.

या सिमद्वारे दररोज २ जीबी डेटा वापरता येईल. (speed)म्हणजे एकूण ३० दिवसांत तुम्हाला फक्त १ रुपयात ६० जीबी पर्यंत हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल.बीएसएनएलच्या १ रुपयांच्या ४जी सिमची वैधता फक्त ३० दिवसांची आहे. सिम घेण्यासाठी संपूर्ण KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे. आधीच सिम असलेल्या ग्राहकांसाठी लागू नाही.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार

सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या

पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल