आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे(gold) दर तब्बल घटले असून दहा ग्रॅम सोन्याची किंमत (जीएसटीसह) एक लाख ३२ हजार ७७० रुपयांपर्यंत आली आहे. त्याचबरोबर चांदीचे दरही एका किलोमागे एक लाख ५८ हजार ९०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. दरांमध्ये झालेली ही घसरण पाहता सोन्या-चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

अमेरिकेत व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने डॉलर मजबूत झाला असून, याचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतातही उमटला आहे. देशातील प्रमुख सुवर्ण बाजारांमध्ये आज सोन्याचे दर एक लाख ३२ हजार ७०० ते एक लाख ३२ हजार ८०० रुपयांदरम्यान होते.
तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातून नफावसुली केली, ज्यामुळे किंमती घसरल्या. अनेक गुंतवणूकदार सध्या सोन्याच्या (gold)दरात स्थैर्य येईपर्यंत थांबण्याची भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पकालीन काळात दरात आणखी किरकोळ घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर काल प्रतिऔंस ४,३८१ डॉलर होते. मात्र, आज ते साडेपाच टक्क्यांनी घसरून ४,११५ डॉलरवर आले आहेत. ही घसरण मागील काही आठवड्यांतील सर्वाधिक मानली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता, डॉलरमधील मजबुती आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या दिशेने वाढलेली कलाटणी या सर्व घटकांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या जागतिक बाजारात झालेली घसरण तात्पुरती असली तरी वर्षाअखेरीस दर पुन्हा स्थिरावतील. भारतात दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने मागणी पुन्हा वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.दरम्यान,गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करावे, असा सल्लाही अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माने का घेतली यशस्वी जयसवालची बॅट? कारण समोर आलं!
शिंदे गटाला मोठं खिंडार, ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार…
प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन…