जर तुम्हाला नवीन क्लायंट आणि ग्राहक मिळत नसल्यास (business)किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसल्यास ऑफिसची किंवा घराच्या दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्साठी करा वास्तूचे हे उपाय जाणून घ्या

उत्तर दिशेला या रंगांचे लाईट लावा
उत्तर दिशेला मऊ, पण आकर्षक प्रकाशयोजना असणे (business)अत्यंत आवश्यक आहे. यासाठी, उबदार पांढरा स्पॉटलाइट बसवा. ज्याचा प्रकाश वरपासून खालपर्यंत पडतो, हा प्रकाश उत्तर दिशेची सकारात्मक ऊर्जा सक्रिय करतो आणि तुमच्या जीवनात नवीन ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतो.
निळ्या बाटलीत मनी प्लांट लावा
या स्पॉटलाइटच्या अगदी खाली निळ्या बाटलीत मनी प्लांट लावा. निळा रंग पाण्याच्या घटकाचे प्रतीक आहे आणि उत्तर दिशा स्वतः पाण्याच्या घटकाशी संबंधित आहे. मनी प्लांट या दिशेची कंपनं आणखी वाढवतो, ज्यामुळे पैशाचा प्रवाह आणि ग्राहकांचा प्रवाह दोन्ही वाढतो.
उत्तर दिशा स्वच्छ ठेवावी
उत्तर दिशा कधीही बंद करू नका. उत्तर दिशेला जड फर्निचर, शूज किंवा रद्दी साठवल्याने ऊर्जा रोखली जाऊ शकते. ही दिशा उघडी, उज्ज्वल आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
सोनेरी किंवा चांदीचा आरसा
जर शक्य असल्यास उत्तर दिशेकडील भिंतीवरील सोनेरी चौकटीचा आरसा लावावा, यामुळे ऊर्जा दुप्पट होते आणि संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते. अशा प्रभावी गोष्टी उत्तर दिशेला ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
हेही वाचा :
आज बलिप्रतिपदाचा दिवस राशींसाठी भाग्याचा! सुख-समृद्धी घरात नांदणार,
नात्यात राहील स्पार्क! शिकून घ्या ‘हे’ टेक्निक;
फॅमिली पिकनिक बनवा आणखीन मजेदार